अर्धापूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; शेळीच्या कळपावर हल्ला, एक बोकूड ठार

लहान परिसरात शेतकऱ्यांसह पशुधन संकटात

1,930

सखाराम क्षीरसागर,

अर्धापूर, नांदेड –

तालुक्यातील अनेक गावातील शेतात गेल्या काही दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. दि.१४ गुरुवारी मध्यरात्री लहान शिवारातील चाळीस शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. या हल्यात २० हजारांच्या बकरा ठार झाल्या आहेत. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अर्धापूर तालुक्यातील लहान शिवारात माजी सरपंच सुधाकरराव पाटील इंगळे यांच्या शेतात चंद्रकलाबाई रमेश पानबुडे यांच्या शेळ्या होत्या.बिबट्याने काळोख्यात शेळ्यांच्या कळपावर हल्ला केला यामध्ये एक बोकुड अंदाजे किंमत वीस हजार रुपये किंमतीचा ठार झाला तसेच अन्य शेळ्यांनी दावण तोडून धुम ठोकल्यामुळे अनेक शेळ्यांचा जीव वाचला. सदरील महिलेचा उदरनिर्वाह शेळीपालनावर चालतो त्यांना वन विभागाने झालेल्या नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील जनतेतून होत आहे.

तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. सध्या शेतामध्ये हरबरा, हळदीची कामे सुरू आहेत तर अनेक शेतकरी जागलीला जात आहेत रात्रीची लाईट जात असल्यामुळे शेतीसह परिसरातील गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार होत आहे. बिबट्यामुळे मनुष्य हानी होणार नाही यासाठी वन विभागाने वेळीच पावले उचलावी अशी प्रतिक्रिया शिवसेना उप तालुकाप्रमुख सदाशिव इंगळे पाटील यांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर बिबट्याचा हैदोस

मागील काळात ग्रामपंचायत निवडणुका होत्या त्यावेळेस अर्धापूर तालुक्यातील अनेक गावातील शेतात बिबट्याने धुमाकूळ घातला होता आता जिल्हा परिषदेच्या तोंडावर पुन्हा बिबट्या धुमाकूळ घालत असल्याने परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.