भारतीय सैन्य दलातून लेफ्टनंट विठ्ठल कदम सेवानिवृत्त ; लोह्यात जंगी स्वागत

435
प्रदीप कांबळे,
लोहा, नांदेड –

भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर कार्यरत लोहा तालुक्यातील मलकापूरचे भूमिपुत्र विठ्ठल बालाजी कदम हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या मायभूमीत आगमन झाल्याबद्दल शहरवासियांनी त्यांचे जंगी स्वागत करत शहरातून उघड्या जीपमधून मिरवणूक काढली. तसेच मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

लोहा तालुक्यातील मलकापूर या छोट्याशा खेड्यातील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मास आलेले विठ्ठल बालाजी कदम यांना प्रारंभी पासूनच सैन्य दलात देशसेवा करण्याची उत्कट इच्छा होती. त्यानुसार त्यांनी अभ्यास, जिद्द, मेहनत व चिकाटीने ते भारतीय सैन्य दलात रुजू झाले. लेफ्टनंट पदावरून ते प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्याबद्दल मलकापूर, रायवाडी, धावरी, लोहा आदींसह इतर गावातील नागरिकांनी त्यांच्या मायभूमीत होत असलेल्या आगमनाप्रीत्यर्थ सेवानिवृत्त कदम यांची शनी मंदिरा पासून मुख्य मार्गाने उघड्या जीपमधून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. तसेच मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
प्रारंभी पत्रकार ज्ञानोबा पवार यांच्या निवासस्थानी त्यांचे कौटुंबिक हृदयी सत्कार करण्यात आला. यावेळी जिजाबाई पवार, गंगाधर सावकार सूर्यवंशी, रायवाडीचे माजी उपसरपंच शिवाजी जिरेवार, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष श्याम पाटील नळगे, पत्रकार शेख अहमद, बाळू पाटील गाडेकर, सुरेश मुर्गुलवार, ज्ञानोबा गायकवाड सह  नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.