अर्धापुरातील बारसगाव येथील अंगणवाडीस मधुरा मायक्रो फायनान्सच्या वतीने साहित्य भेट

480

अर्धापूर, नांदेड –

तालुक्यातील बारसगाव येथील अंगणवाडीस मधुरा मायक्रो फायनान्सच्या वतीने खुर्च्या, सतरंज्या व साहित्य वाटप करण्यात आले आहे.

भारत सरकारच्या बाल विकास प्रकल्प योजना अंतर्गत बाल संगोपन तसेच माता संशोधन अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आवड निर्माण व्हावी यासाठी मधुरा मायक्रो फायनान्सच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे, सरपंच मनीषा खंडागळे, उपसरपंच सरिता बालाजी गोदरे, पर्यवेक्षक कांबळे, मुंगल, अमोल बारसे मधुरा मायक्रो फायनान्सचे मॅनेजर विलास कसबे, अनिल लोणी, माणिकराव घुले, विष्णू वानखेडे, अनिल वडजे, साईनाथ माने, ज्ञानेश्वर माऊले, इमरान शेख, महादेव पल्लेवाड, मोतीराम पिकले यांच्या उपस्थितीत अंगणवाडीस खुर्च्या, सतरंज्या व साहित्य भेट देण्यात आले.

यावेळी अंगणवाडी सेविका गंगाबाई मोरे, निता खंदारे, वैशाली पवार, रंजीता काळे, गंगाबाई बारसे, सारजाबाई खंडागळे आदीना अंगणवाडी साहित्य भेट दिले. यावेळी बारसगाव येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.