लोहा मुख्याधिकारी पेंटे यांची धडक कार्यवाही, चार दुकानांना ठोकले सील

एकाच दिवसात तब्बल 5 लक्ष रुपयांची मालमत्ता कर वसुली

440

लोहा, नांदेड –

लोहा नगर पालिका प्रशासनाच्या कार्यवाहीचे भय नसलेल्या तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या शहरातील मालमता धारकांना मुख्याधिकारी ॲड.गंगाधर पेंटे यांनी कायद्याचा बडगा दाखविला आहे. मागणी पत्र देऊनही कर वेळेवर न भरणाऱ्या शहरातील चार कारचुकार दुकानांना मुख्याधिकारी यांनी सील ठोकले व एकाच दिवशी रेकॉर्ड ब्रेक ५ लक्ष रुपयांची मालमता कर वसुली केली.

लोहा शहरातील मालमता कर तसेच फ्लॉटिंग करून त्याची विक्री झालेली व अकृषिक कर आकारणी जे थकीत मालमत्ता भरणा न करणाऱ्यांची शहरात मोठी संख्या आहे. मालमता व नळ बिलापोटी जवळपास दोन कोटीहुन अधिक कर भरावा अपेक्षित आहे. कोरोना काळात वसुली झाली नाही पण यंदा मात्र मुख्याधिकारी ॲड. गंगाधर पेंटे यांनी मालमता कर वसुलीसाठी मागील पंधरा दिवसा पासून कामाचा सपाटा लावला आहे.

मुख्याधिकारी पेंटे यांनी काल रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही स्वतः शहरात वसुलीसाठी दुकानावर जाऊन शहरातील पाच दुकानावर कार्यवाही केली.त्या दुकानाला नगर पालिका प्रशासनाने सील ठोकले. मुख्याधिकारी पेंटे यांची ही धाडसी कार्यवाही ठरली. त्यांच्यासोबत कर निरीक्षक माधव पाटील पवार, शेषराव भिसे, शंकर वाघमारे, चांदू राजकौर, विष्णू भिसे यांच्या पथकाने रविवारी मुख्याधिकारी यांच्यासोबत शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन कर वसुली केली. पूर्वी सूचना देऊन ही कर भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या दुकानांना सील ठोकण्याची कार्यवाही झाल्याने कर भरणा थकीत असलेल्या व टाळाटाळ करणाऱ्यांनी जप्ती टाळण्यासाठी पैसे भरून नामुष्की टाळली.

एकाच दिवसात केली तब्बल 5 लक्ष रुपयांची वसुली

मुख्याधिकारी गंगाधर पेंटे हे कायद्याचे पदवीधर असून सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. तसेच हायकोर्टात त्यांनी काही काळ वकिलीही केली. त्यामुळे कायद्याचे सखोल ज्ञान असलेल्या मुख्याधिकारी ॲड.पेंटे यांनी दुकानाला सील ठोकण्याची कार्यवाही केली. त्यामुळे एका दिवसात तात्काळ रेकॉर्ड ब्रेक पाच लक्ष रुपये जमा झाले.शहरातील मालमत्ता धारकांनी वेळेवर कर भरावा व पालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पेंटे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.