धनेगाव ग्रामपंचायतमध्ये महर्षी मार्कण्डेय जयंती उत्साहात साजरी

82

नांदेड –

नांदेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली धनेगाव/मुजामपेठ ग्रामपंचायतचे सरपंच पिंटू पाटील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मार्कण्डेय जयंती  उत्साहात साजरी करण्यात आली.  मार्कण्डेय जयंती या सभागृहात गेल्या पंधरा वर्षापासून नियमितपणे साजरी केली जाते. धनेगाव ग्रामपंचायत प्रत्येक ऋषी, महापुरुष व नेत्यांची जयंती साजरी करत असल्याने या ग्रामपंचायतचे सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे.

यावेळी मार्कण्डेय जयंतीनिमित्त विणकर वसाहत, दुधडेअरी येथील मंदिरामध्ये महर्षी मार्कण्डेय ऋषींच्या मूर्तीचा अभिषेक करून महाआरती करण्यात आली. नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या दुधडेअरी येथील महर्षी मार्कण्डेय चौकाचे पूजन करून ध्वज फडकविण्यात आले.

याप्रसंगी जि.प.सदस्य मनोहर पाटील शिंदे, सरपंच गंगाधर ऊर्फ पिंटू पाटील शिंदे, पदमशाली समाजाचे युवा जिल्हाध्यक्ष संग्राम निलपत्रेवार, नगरसेवक नागेश कोकुलवार, शिवसेना तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य भुजंगराव भालके, ग्रामपंचायत सदस्य सौ.ललिता निलपत्रेवार, तातेराव ढवळे, डॉ. प्रकाश शिंदे, गणेशराव पाटील शिंदे, अब्दुल गफूरभाई, शेख फारुख भाई, शिवाजी बुचडे, राजेश्वर बोटलावर,जळबाजी बुचडे, दुधडेअरी पदमशाली समाजाचे अध्यक्ष बजरंग नागलवार, सचिव गणेशराव गोणे, कोषाध्यक्ष प्रल्हाद गुजरवार, प्रवीण राखेवार, प्रभाकर शिंदे, व्यंकट निलपत्रेवार, गोपाळ आंचेवार, गुणाजी बुचडे, श्रीनिवास माडेवार, लखन नंदलवार, गोविंद मोरेवार, विठ्ठल गंजेवार, अमृत जिंदम, विजय गुजरवार, सौ. मंदोदरी निलपत्रेवार, सौ.पार्वतीबाई चातरवार, इंदिराबाई बिरेवार, सौ.प्रतिभा गोणे यांच्यासह असंख्य महिला व नागरीक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.