नांदेड पोलिसांच्या सायबर विभागाची मोठी कारवाई ! ड्रीम-11 मद्धे तरुणाने जिंकलेले 69 लाख रुपये दिले मिळवून परत; क्रिकेटची टीम बनवून तरुणाने जिंकले होते एक कोटी रुपये

3,035

नांदेड –

नांदेडच्या एका तरुणाने ‘Dream-11 App’ च्या माध्यमातून क्रिकेटची टीम बनवून त्याद्वारे एक कोटीचे बक्षीस जिंकले आहे. मात्र, बक्षिसाची ही रक्‍कम या तरुणाच्या खात्यात जमा होण्यापूर्वीच ऑनलाईन घोटाळा करून ही रक्‍कम हडप करण्याचा प्रयत्न ऑनलाईन घोटाळेबाजांनी केला. मात्र नांदेडच्या सायबर सेल पोलिसांनी हा डाव उधळून लावला असून नांदेडच्या युवकास बक्षिसाचे एकूण 70 लाख रुपये परत मिळवून दिले आहेत. सदर तरुण हा नांदेडच्या तरोडा भागातील रहिवासी असून सुरक्षेच्या कारणावरून त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.

शहरातील एका तरुणाने दि.10 मे रोजी IPL मधील गुजरात टायटन विरूध्द लखनऊ सुपर जॉयंटस या IPL क्रिकेट सामन्याच्या वेळी Dream 11 Team App वर स्वतःची टीम लावली होती. त्या तरुणांची टीम Dream- 11 App वर पहिल्या क्रमांकावर आली होती. त्या व्यक्तीला Dream 11 Team कडून 1 करोड रूपयाचे बक्षिस मिळाले होते. मिळालेल्या बक्षिस वर 30% Tax लागून उर्वरीत रूपये 70 लाख त्याच्या Dream 11 खात्यावर जमा झाले होते. जमा झालेल्या रक्कमेतून त्याने 1 लाख रूपये स्वतःच्या बँक खात्यात जमा केले होते. परंतु, उर्वरीत पैसे बँक खात्यात जमा करत असताना अज्ञात सायबर गुन्हेगाराने बक्षिस मिळालेल्या व्यक्तीस कॉल करून सांगितले की, ‘’Dream-11 Team” कडून बोलत आहे. तुम्हाला 1 करोड रूपयाचे बक्षिस लागले आहे. त्या संदर्भात कागदपत्रे पडताळणी करायची आहे ’’, असे म्हणून त्या व्यक्तीकडून OTP घेवून त्याचे Dream-11 Team App वरील मेल आयडीमध्ये बदल केला.

सदर व्यक्तीचे जिंकलेले पैसे बँक अकाउंटवर ट्रान्स्फर होत नसल्याने त्या व्यक्तीने सायबर पोलीस स्टेशन नांदेड येथे तक्रार केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मा.पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मा.अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे व मा.अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शानाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, पोलीस उपनिरीक्षक सोपान थोरवे व पोलीस अंमलदार विलास राठोड, मोहन स्वामी यांनी Dream-11 Team यांना तात्काळ ई-मेल व फोन कॉल करून सदर व्यक्तीचे जिंकलेले पैसे तात्काळ फ्रिज म्हणजेच रोखण्यास सांगितले व सदर व्यक्तीस तात्काळ मुंबई येथील Dream-11 Team च्या ऑफीसला जाऊन भेटण्यास सांगितले.

सायबर गुन्हेगाराने सदर व्यक्तीचे मेलमध्ये केलेले बदल व सायबर शाखा नांदेड येथून करण्यात आलेले ई-मेल यावरून सदर व्यक्तीचे Dream 11 Team खाते सस्पेंड करण्यात आले व रक्कम फ्रीज करण्यात आली. नांदेड सायबर शाखेच्या सुचनेनुसार सदर व्यक्ती मुंबईला संबंधीत Dream-11 ऑफीसला गेल्यावर सायबर पोलीस स्टेशन नांदेड येथून प्राप्त् मेलनुसार त्याची खात्री करून त्यास त्याची 69 लाख रुपये त्याच्या बँक खात्यात जमा करून देण्यात आली. सायबर पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ कार्यवाही केल्याने त्या व्यक्तीचे Dream-11 Team द्वारे जिंकलेले 69 लाख रूपये परत मिळाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.