महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती पूर्व तयारीची महापौरांकडून पाहणी

173

नांदेड –

महाराणा प्रतापसिंह यांचा जयंती सोहळा येत्या 2 जून रोजी साजरा होणार आहे. जयंती सोहळ्याच्या अनुषंगाने महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याच्या डागडुजी आणि सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी महापौर जयश्री निलेश पावडे यांच्यासह महानगरपालिकेतील अनेक मान्यवरांनी केली.

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून नांदेड शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी आणि महापुरुषांचा विचार वारसा येणाऱ्या अनेक पिढ्यांना मिळत राहावा या उद्देशातून शहरात अनेक महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप सिंह यांचा पुतळा मोठ्या दिमाखात उभा आहे.

येत्या 2 जून रोजी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी होणार आहे. जयंतीची पूर्वतयारी म्हणून महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळा सुशोभीकरण आणि डागडुजीचे काम महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. या कामाची पाहणी दि.26 मे रोजी महापौर जयश्री निलेश पावडे यांनी केली. यावेळी विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, उपमहापौर अब्दुल गफार, माजी उपमहापौर आनंद चव्हाण , नगरसेवक प्रतिनिधी वाजिद भाई, संगीता पाटील डक,अमित तेहरा, मुंतजिब शेख, अभियंता स्वामी, ठाणेदार, संधू महाराज आणि नांदेड तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष ॲड.निलेश पावडे आदींची यावेळी उपस्थिती होती

Leave A Reply

Your email address will not be published.