मराठवाडा लॅबोरेटरी प्रा.लि.नांदेड येथे कमलनयन बजाज हॉस्पिटल कॅन्सर तज्ञ डॉ.अभिनव झंवर यांची भेट; दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी नांदेडात

296

नांदेड –

येथील सन्मान प्रेस्टिज् संकुलातील मराठवाड्यातील अद्ययावत व एन.ए.बी.एल नामाकंन प्राप्त एकमेव पॅथॉलॉजी लॅबोरेटरी असलेल्या मराठवाडा लॅबोरेटरी प्रा.लि.नांदेड येथे औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध कमलनयन बजाज हॉस्पिटल कॅन्सर विभागाचे कॅन्सर तज्ञ डॉ.अभिनव झंवर यांची दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी नांदेड येथे भेट सुरू केली आहे तरी याचा लाभ कॅन्सर रुग्णांना होईल असा आशावाद मराठवाडा लॅबरोटोरीजच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आला.

डॉ.अभिनव झंवर यांच्या प्रथम नांदेड भेटीबद्दल त्यांचे मराठवाडा लॅबरोटोरीजच्या वतीने एम. डी. पॅथॉलॉजीस्ट डॉ.वैशाली भागानगरे यांनी त्यांचे स्वागत केले डॉ.झंवर हे MD (Med), DM (Medical Oncology), From Tata Memorial Hospital MRCP (SCE, London), ECMO Consultant Medical Oncologist, Expertise in Cancer , Chemotherapy, Immunotherapy, Targeted Therapy, Metronomic Therapy यात पारंगत आहेत.

तरी या भेटीचा कॅन्सर रुग्णांनी लाभ घेण्याकरीता मराठवाडा लॅबोरेटरी प्रा.लि. सन्मान प्रेस्टिज बिल्डींग, पहिला मजला, जिल्हा परिषदेच्या बाजुला, नांदेड 02462-234344, 8007003388 येथे संपर्क साधण्याचे आवाहन संचालक श्री गणेश बोंढारे यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.