देश हादरवणारी मर्डर मिस्ट्री ! ‘लिव्ह इन’मधील प्रियकराने प्रेयसीचा खून करून क्रौर्याची परिसीमा गाठली, मृतदेहाचे केले 35 तुकडे; रात्री जंगलात फेकत होता मृतदेहाचे तुकडे

3,599

नवी दिल्ली –

दोघेही आकंठ प्रेमात बुडाले आणि काही दिवसानंतर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मद्धे राहू लागले.काही काळानंतर प्रेयसी लग्‍न करण्‍यासाठी आग्रह धरू लागली. याच वादातून दोघाचे खटके उडू लागले. प्रियकराने प्रेयसीचा निर्घृण खून केला. मात्र यानंतर क्रौर्याची परिसीमा झाली. त्‍याने प्रेयसीचा मृतदेहाचे 35 तुकडे करून शहरातील विविध 36 भागात टाकले.

अंगाचा थरकाप उडविणारा हा प्रकार देशाची राजधानी दिल्‍लीत घडला असून, पाच महिन्‍यांपूर्वी घडलेला हा भयंकर गुन्‍हा आता उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी आफताब अमीन पूनावाला याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पालघरमध्‍ये राहणार्‍या आफताब पूनावाला याची मुंबईत राहणार्‍या 26 वर्षीय श्रद्धासोबत ओळख झाली. श्रद्धा मुंबईत एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. कुटुंबीयांचा या नात्‍याला विरोध होता म्हणून दोघेही दिल्‍लीला पळून गेले. छतरपूर परिसरात त्‍यांनी फ्लॅट भाड्याने घेतला. मुलीशी संपर्क झालेला नाही. मुलीचे अपहरण झाले आहे, अशी तक्रार श्रद्धाचे वडील विकास मदन यांनी दिल्‍लीत मेहरौली पोलीस ठाण्‍यात 8 नोव्‍हेंबर रोजी दाखल केली होती. दिल्‍ली पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला तेंव्हा धक्‍कादायक माहिती समोर आली.

6 महिन्‍यांपूर्वीच केला श्रद्धाचा खून, मृतदेहाचे तुकडे ठेवण्‍यासाठी घेतला फ्रिज

पोलीस तपासात अनेक धक्‍कादायक खुलासे झाले. आफताब आणि श्रद्धा दिल्‍लीत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ राहू लागले. काही दिवसानंतर श्रद्धा लग्‍नाचा आग्रह करु लागल्याने यावरुन दोघांमध्‍ये वाद झाला.18 मे 2022 रोजीच आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. यानंतर धारदार शस्त्राने तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. कापलेले तुकडे ठेवण्‍यासाठी फ्रीज विकत घेतला. पुढील सलग 16 दिवस तो रात्रीच्‍या वेळा घराबाहेर जावून दिल्‍लीच्‍या आसपासच्‍या परिसरात त्‍याची विल्‍हेवाट लावल्‍याचे पोलीस तपासात स्‍पष्‍ट झाले. दिल्‍ली पोलिसांनी आफताब पूनावाला यााला छतरपूर येथील फ्लॅटमधून ताब्यात घेतले. त्‍याने दिलेल्‍या माहितीच्‍या आधारे जंगल परिसरात शोध मोहिम राबवली. घटना स्थळावरून काही हाडे सापडली आहेत. या प्रकरणी दिल्‍ली पोलीस तपास करत आहे.

करवताने शरीर कापून तुकडे केले…

पोलिसांच्या माहितीनुसार, आफताबने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी करवताचा वापर केला. त्याने प्रथम तिच्या हाताचे तीन तुकडे केले. त्यानंतर पायाचेही 3 तुकडे केले. त्यानंतर तो दररोज काही तुकडे बॅगेत भरून दिल्लीत फेकून देत होता.

मुलीने फोन उचलणे बंद केल्यानंतर कुटुंबाने गाठली दिल्ली

18 मेपासून श्रद्धाने कुटुंबाचा फोन उचलणे बंद केले. यामुळे काळजीत पडलेल्या तीचे वडिल मुलीची विचारपूस करण्यासाठी 8 नोव्हेंबर रोजी दिल्लीला पोहोचले. तिथे तिच्या फ्लॅटला टाळे लागले होते. त्यांनी मेहरौली पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली.

Leave A Reply

Your email address will not be published.