नॅशनल चाईल्ड अँड वूमन डेव्हलपमेंट कौन्सिल नांदेड शाखेच्या वतीने जागतिक महिलादिन विविध उपक्रमाने साजरा

310
नांदेड –

जागतिक महिला दिनानिमित्त नॅशनल चाईल्ड अँड वुमेन कौन्सिल आणि ग्रिनोरा फाऊंडेशन नांदेड जिल्हा व शहर शाखेच्या वतीने दि. 8 व 9 मार्च रोजी शहरातील कौठा भागातील नागार्जुना शाळेजवळील प्ले म्यानिया टर्फ मैदानावर महिला दिन विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला कौन्सिलचे महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी हरजिंदरसिंघ संधू यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी पोषण व डाएट कौन्सिलिंग, तणावमुक्ती व्यवस्थापन, स्वयं आत्मसंरक्षण, तसेच विविध खेळ व मनोरंजनपर कार्यक्रम घेऊन महिला दिन साजरा करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन कौन्सिल जिल्हाध्यक्ष शिवानीताई पाटील, शहराध्यक्षा जयश्री यशवंतकर, शिवानीताई वेलगम चारी, अमन कोका, मनीष वर्मा, अनुज अडकटलवार तसेच कौन्सिल आणि ग्रिनोरा फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने संपन्न झाले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांना कौन्सिल जिल्हाध्यक्ष शिवानीताई पाटील व ग्रिनोरा फाऊंडेशन तर्फे महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन आभार मानण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.