नांदेड हादरले ! माता न तू वैरिणी..आईनेच केली पोटच्या दोन चिमुकल्यांची हत्या; आई व भावाच्या मदतीने प्रेते जाळून पुरावा केला नष्ट

भोकर तालुक्यातील पांडुरणा येथील घटना

7,683

नांदेड –

भोकर तालुक्यातील पांडुरणा येथे आईने स्वतःच्या दोन चिमुकल्यांची हत्या करून, आई व भावाच्या मदतीने पुरावा नष्ट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भोकर पोलिसांत आज पहाटे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या धक्कादायक घटनेची सविस्तर माहिती अशी की, धुरपताबाई गणपत निमलवाड, वय ३० रा.पांडूरणा असे प्रमुख आरोपीपी महिलेेेचे नाव आहे. सदरील महिला पांडुरणा येथे शेतात पती आणि दोन वर्षाचा मुलगा व अवघ्या ४ महिन्याच्या मुलीसह राहत होती. तर घरातील सासु – सासरे व इतर दोघे दुसऱ्याच्या शेतात राहतात. दरम्यान, आरोपी धुरपताबाई निमलवाड हिने दि.३१ मे ते १ जून सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मुलगा दत्ता गणपत निमलवाड, वय २ वर्षे व मुलगी अनुसया गणपत निमलवाड, वय ४ महिने या दोघांची पांडुरणा शिवारात हत्या केली.

त्यानंतर आरोपीने आपली आई कोंडाबाई पांडुरंग राजेमोड व भाऊ माधव पांडुरंग राजेमोड, रा. ब्राम्हणवाडा ता.मुदखेड, जि. नांदेड यांच्या मदतीने दोन्ही मयत लेकरांचे प्रेत जाळून पुरावा नष्ट केला.आरोपी आईने पोटच्या लेकरांना इतक्या क्रूरतेने का मारले? हे अद्याप समजु शकले नाही. याबाबत गावातील गोविंद दगडुजी निमलवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी धुरपताबाई गणपत निमलवाड, कोंडाबाई पांडुरंग राजेमोड, माधव पांडुरंग राजेमोड आदी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उप निरीक्षक दिगंबर पाटील पुढील तपास करीत आहेत.

घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी दाखल

भोकर तालुक्यातील पांडुरणा येथील घटनास्थळास उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील तसेच भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास पाटील तसेच तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक दिगांबर पाटील यांनी भेट दिली असून यातील नराधम आईस आणि तिला मदत करणाऱ्या तिच्या आई व भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.आरोपी महिला माता ही वैरिणी का झाली याचा नेमका तपास पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.