नांदेडचा राज्यात डंका ! सीसीटीएनएस कार्यप्रणालीत नांदेड जिल्हा पोलीस राज्यात प्रथम

458

नांदेड-

राज्याच्या गुन्हे अन्वेषण (पुणे) विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्याकडून पोलीस घटकांच्या सीसीटीएनएस (गुन्हे व गुन्हेगार तपास जाळे प्रणाली)  कामगिरी बाबतचा आढावा दर महा घेण्यात येतो. राज्यातील सर्व घटकांचे माहे नोव्हेंबर- २०२२ मधील सीसीटीएनएस मासिक कामगिरी अहवालांचे अवलोकन करुन देण्यात आलेल्या गुणांकनानुसार नांदेड जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये नांदेड जिल्ह्यातील 36 पोलीस स्टेशन येथे दाखल होणारे प्रथमखबर, घटनास्थळ पंचनामे आरोपी अटक, मालमत्ता जप्ती, दोषारोप पत्र न्यायालयीन निकाल, हरवलेले इसम अनोळखी मयत, अदखलपात्र खबर, गहाळ, बेवारस मालमत्ता, प्रतिबंधक कार्यवाही व इतर नोंदी अशा एकुण 18 प्रकारच्या माहितीची सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये मध्ये नोंदी करण्यात येतात.

तसेच सीसीटीएनएस (गुन्हे व गुन्हेगार तपास जाळे प्रणाली) प्रणालीचा दैनदिन कामकाजात वापर करुन गुन्हे प्रतिबंध गुन्हे उघडकीस आणून चांगली कामगिरी करण्यात आली तसेच आयटीएसएसओ, आयसीजेएस व सीआरआय-मॅक पोर्टलाचा प्रभावीपणे वापर केल्याने माहे नोव्हेंबर 2022 मध्ये नांदेड जिल्ह्याने 342 गुणांपैकी 307 गुण मिळवुन महाराष्ट्र राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीएनएस नोडल अधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार व डॉ.खंडेराय धरणे आणि त्यांची सीसीटीएनएस टीम पोउपनि रहिम बशीर चौधरी, मपोउपनि प्रणीता राजाराम बाभळे, पोलीस नाईक समीरखान मुनीरखान पठाण, पोलीस नाईक ओंकार सुरेश पुरी, पोलीस अंमलदार माधव नारायण येलवाड यांचे अथक परिश्रमामुळेच नांदेड पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.