नांदेडच्या लताताई उमरेकरची जपान येथे होणाऱ्या जागतिक पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघात निवड; आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मदतीची गरज

586

नांदेड –

नांदेडच्या दिव्यांग खेळाडू लताताई परमेश्वर उमेरकरची पॅरा (दिव्यांग) जागतिक बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे, दिव्यांगपणावर मात करत जागतिक स्पर्धेपर्यंत मजल मारणारी नांदेड जिल्हयाची पहिली दिव्यांग शटलर् बॅडमिंटन खेळाडू असून तिने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ब्राझील आणि दुबई येते दोन कांस्य पदकाची कमाई केली आहे, त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर पाच पदके प्राप्त केली आहेत.

मात्र, या जागतिक स्पर्धेसाठी जाण्या-येण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. या स्पर्धा एवढ्या मोठ्या असून देखील शासनाची कोणतील आर्थिक मदत मिळालेली नाही. लताताईची परीस्थिती हलाखीची असून देखील तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. या स्पर्धेत भारतीय संघात महाराष्ट्रातून (एसएचजी) गटातून ती एकमेव खेळाडू आहे, जगात मानाच्या स्पर्धा मानल्या जाणाऱ्या (world championship) ही एक स्पर्धा असून त्या दिनांक 1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2022 दरम्यान टोकियो, जपान येथे होणार असून, तिला 28 ऑक्टोबर 2022 रवाना व्हायचे आहे.

नांदेड जिल्ह्यातून तिने आपली जागा निश्चित केली आहे. याचा गर्व राज्याला आणि जिल्ह्याला दिसून येत नाही, दिव्यांगाच्या ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत दिव्यांगानी सर्वात जास्त पदकाची कमाई केली असून तरी पण केंद्र आणि राज्य सरकार दिव्यांग खेळाडू बाबत उदासीन दिसत आहेत.

या स्पर्धा वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनच्या मान्यतेने होत असून या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी लताताईला 3.50 लक्ष रुपयाची आर्थिक गरज असून तिला समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करून या world championship च्या मोठ्या स्पर्धेत जाण्याची आणि तिच्या पंखांना बळ व वर्ल्ड चॅम्पयनशिपमध्ये मेडल मिळवण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती आंतरराष्ट्रीय पदक विजेती खेळाडू लताताई उमरेकर हिने केली आहे.

जागतिक पॅरा बॅडमिंटन दिनांक 1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2022 दरम्यान टोकियो जपान येथे होणार आहेत. तिच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तिला आर्थिक मदत करण्यासाठी भारतीय स्टेट बँक, A/C 62238707698. IFSC- SBIN0020050.Branch- vazirabad nanded. Mobil no. 9960784967 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.