माहुरच्या श्री रेणुकादेवी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा
माहूर, नांदेड –
दि.28 फेब्रु.2022 रोजी बळीराम पाटील मिशन संचलित श्री रेणुकादेवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माहूर येथे सर सी.व्ही.रमण यांच्या रमण इफेक्ट या शोधाला 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या दिवसापासून संपूर्ण भारतात याच दिवशी “राष्ट्रीय विज्ञान दिन” साजरा करण्यात येतो.
याच दिनाचं औचित्य साधून महाविद्यालयात बळीराम पाटील मिशन मांडवीचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री प्रफुल्ल राठोड साहेब तथा सौ.संध्याताई राठोड सचिव, बळीराम पाटील मिशन, मांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्यांच्या प्रेरणेने विविध प्रकारचे उपक्रम घेण्यात आले. त्यात सर सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ऑनलाईन क्विझ व भितीपत्रक प्रदर्शन करून विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने साजरा करण्यात आला.
यावेळी प्राचार्य, डॉ.एन.जे.एम.रेड्डी उपप्राचार्य, डॉ. लोणे राजेंद्रकुमार संस्था समन्वयक प्रा.नसीर एन. बी. आय.क्यू.ए.सी समन्वयक प्रा. गजानन झुंझारे विज्ञान विभागाचे समन्वयक प्रा.बालाजी कोलपवार तसेच डॉ.दिनेश विजिगीरी डॉ.अरविंद हरकल,डॉ.मुज्जेवार, प्रा.विजयपाल वाढवे डॉ.इकबाल खान, डॉ.गरूनुले, डॉ.जाधव, प्रा.अनिल दोंदे आणि ग्रंथपाल, डॉ. काशिनाथ राठोड, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.