नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या ओबीसी पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील अधिवेशनास उपस्थित रहावे- राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष लक्ष्मण क्षीरसागर
अर्धापूर, नांदेड-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेशाचे अधिवेशन दि.25 मे रोजी सकाळी 10 वा.यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनास ओबीसी आरक्षण या विषयावर अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार असून या अधिवेशनास नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या पदाधिका-यांनी व विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष ओबीसी चळवळीत प्रमुख कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे नांदेड जिल्हाध्यक्ष लक्ष्मण क्षीरसागर यांनी केले आहे.
केंद्र सरकारकडून ओबीसींचे हक्क हिसकावण्याच्या विरोधात, सापत्न वागणूक, जातीय जनगणना,ओबीसींचं राजकीय आरक्षण, बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांच्यावर आलेले आर्थिक संकट,ओबीसी व्हिजेएनटी यांच्यासाठी संघर्षाचा लढा, मंडल आयोगाची संपूर्णपणे अंमलबजावणी अशा अनेक महत्त्वपूर्ण विषयावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील, ओबीसीचे राष्ट्रीय नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंत्री ना.जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना दत्ता भरणे, उद्योग राज्यमंत्री ना.आदिती तटकरे, राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
मार्गदर्शनापूर्वी ओबीसी घटकातील विविध समाज बांधव, पदाधिकारी यांच्यासोबत चर्चासत्र तसेच त्यांना भेडसावऱ्या समस्या आणि वेळेवर येणाऱ्या विषयावर विचारमंथन होणार आहे. या राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या अधिवेशनास नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या प्रदेश पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि ओबीसी चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी ओबीसी सेलचे नांदेड जिल्हाध्यक्ष लक्ष्मण क्षीरसागर यांनी केले आहे.