एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे बंडखोर आ.बालाजी कल्याणकर यांच्या केसालाही धक्का लावण्याची हिम्मत कोणात नाही- खा.प्रताप पाटील चिखलीकर
नांदेड –
खा.प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिक्रिया
सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण होऊन मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडामुळे राज्यात मोठा भूकंप आला आहे. राज्यात विविध ठिकाणी सेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर हल्ले होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नांदेड उत्तरचे बंडखोर शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या केसालाही हात लावण्याची कोणात हिम्मत नाही, अशी परखड प्रतिक्रिया भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देऊन एकप्रकारे शिवसैनिकांना इशारा दिला.
शिंदेंच्या राजकीय बंडानंतर शिवसेनासुद्धा आक्रमक झाली आहे. खासदार संजय राऊत यांनी सुद्धा बंडखोरांना इशारा दिला होता.त्यामुळे अनेक सेना आमदारांच्या कार्यालयावर हल्ले होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ही जाहीरपणे ही भुमिका मांडली आहे.
काय म्हणाले खा.प्रताप पाटील चिखलीकर..
नांदेड उत्तरचे बंडखोर सेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या केसालाही हात लावण्याची कोणात हिम्मत नाही, अशी परखड प्रतिक्रिया देताना भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसैनिकांना इशारा दिला आहे. बालाजी कल्याणकर हे शिंदे गटासोबत सामील झाले आहेत. कल्याणकर यांच्या कार्यालयावर शिवसैनिक हल्ला करणार असल्याच्या चर्चा आहे. त्यावर विचारले असता खासदार चिखलीकर यांनी आमदार कल्याणकर यांची पाठराखण केली. कल्याणकर यांच्यावर हल्ला करणे एवढे सोपे नाही. कोणीही कोणाला धमकी देऊ शकतात, पण ते करणे अवघड असते, असे चिखलीकर म्हणाले.
आमदार कल्याणकर हे सेना- भाजप युतीचे उमेदवार होते
आमदार बालाजी कल्याणकर हे सेना भाजपचे उमेदवार होते. त्यांच्यासाठी भाजपनेही मेहनत घेतली. हिंदुत्वाच्या मुद्यावर ते एकनाथ शिंदेसोबत गेले आहेत. त्यामुळे कल्याणकर यांच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार चिखलीकर यांनी दिली. कल्याणकर यांच्यावर हल्ला करणे एवढे सोपे नाही. कोणीही कोणाला धमकी देऊ शकतात. शिवसेनेचे खासदार नाराज असून सत्ता स्थापन झाली की सेनेच्या 18 खासदारांपैकी किमान 10 खासदार भाजपात प्रवेश करतील, अशी प्रतिक्रिया खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे.