ओबीसी कर्मचार्‍यांनी ओबीसी आंदोलनासाठी योगदान द्यावे – प्रा.सुशिलाताई मोराळे

308

अर्धापूर, नांदेड-

ओबीसी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने रविवार, दि.13 मार्च रोजी सावित्रीबाई फुले स्मृती अभिवादन कार्यक्रमानिमित्त ओबीसी समाजातील आदर्श शिक्षक, प्राध्यापक व गुणवंतांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना प्रा. सुशिलाताई मोराळे म्हणाल्या की, ओबीसी कर्मचार्‍यांनी ओबीसी आंदोलनासाठी आपले योगदान द्यावे. ओबीसी आंदोलन हे कमकुवत असून ते जर गतिमान करायचे असेल तर मंडल आयोगाच्या लाभार्थ्यांनी म्हणजेच कर्मचार्‍यांनी ओबीसी आंदोलनाला गतिमान करण्यासाठी वेळ, पैसा आणि बुद्धी याचे योगदान द्यावे, असे आवाहन प्रा.सुशिलाताई मोराळे यांनी केले.

ओबीसींनी न लढता ओबीसी समाजाला मिळालेल्या आरक्षणाची देशाचे आयकॉन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 340 व्या कलमानुसार मुहूर्तमेढ रोवली. माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी आपल्या राजपाटाचा त्याग करून ओबीसी प्रवर्गासाठी मंडल आयोग दिला आहे. या अशा ओबीसी चळवळीला कर्मचार्‍यांनी शिराधार्य घेऊन आपले योगदान द्यावे लागेल, असेही त्या म्हणाल्या.

सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजीराव इबितदार हे होते, तर स्वागताध्यक्ष नामदेवराव आयलवाड हे होते. शिक्षणाधिकारी श्रीमती सविता बिरगे तसेच साहित्यिक देवीदास फुलारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास ओबीसी नेते विजयराव देवडे, रामचंद्र येईलवाड,आर.के.दाभडकर,विश्वनाथ कोलमकर, नागनाथ देशमुख, दत्ता टोकलवाड, पद्मा झंपलवाड, अरूणा पुरी, चंद्रकांत दामेकर, लक्ष्मण लिंगापुरे, नागनाथ चिटकुलवार, भुमन्ना आक्केमवाड, बाळासाहेब पांचाळ, बालाजी राठोड, डॉ.झोरे, प्रकाश राठोड इत्यादी ओबीसीतील जात संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सदरील कार्यक्रम यशस्वितेसाठी राजेश चिटकुलवार, गंगाधर मंदेवाड, रवींद्र बंडेवार, प्रा.दिलीप काठोडे, विनोद सुत्रावे, वाय.जी.देवकर, माधव परगेवार, संजय पेटकर, बालाजी चक्रधर, प्रल्हाद राठोड, रमेश माळगे, विजय इंदूरकर, बाबुराव माडगे, पंदीलवाड सर, व्यंकटेश उकरंडे, रामदास केंद्रे, बालाजी गादगे, गंगाधर निलमलवाड, बाबुराव कापसे, पांडुरंग कोकुलवार आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.