गोदावरी अर्बन बँकेच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’ निमित्त अर्धापूर शहरातील मान्यवर डॉक्टरांचा सत्कार..!
अर्धापूर, नांदेड-
गोदावरी अर्बन बँकेच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’ चे औचित्य साधत अर्धापूर शहरातील नामवंत डॉक्टरांचा दि.५ मंगळवार रोजी शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. कोविड महामारी काळात जीवाची पर्वा न करता कर्तव्य दक्षतेने आणि समर्पण भावनेने डॉक्टरांनी केलेल्या रुग्णसेवेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्दिष्टाने डॉक्टर्स डे निमित्त सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ.उत्तमराव इंगळे, डॉ.ओमप्रकाश जडे, डॉ.शरद चरखा, डॉ.विशाल लंगडे, डॉ.गोरखनाथ टेकाळे, डॉ.नितीन हाके, डॉ.प्रसाद वानखेडे, डॉ. शंकर कवठेकर, डॉ.गजानन कड आदीसह अनेक डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.
गोदावरी अर्बनचे मॅनेजर गणेश जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष आप्पाराव बुटले, बँकेचे सल्लागार सदस्य नागोराव भांगे, महामृत्युंजय दूत गोविंद टेकाळे, पत्रकार सखाराम क्षिरसागर, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस रामराव भालेराव, शेतकरी तुळशीराम बंडाळे यांची उपस्थिती होती. यावेळी सुनील कदम, पांडुरंग कदम, अविनाश किरकण, चंद्रकांत पवार, राधा फुलवारे, लोभाजी कदम, संदीप देशमुख आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.