अर्धापूर शहरात अंगणवाडीत पहिल्या दिवशी बालकांचा प्रवेश उत्सव दिन साजरा

711

अर्धापूर, नांदेड-

शहरातील अंबाजी नगरातील १५/२ अंगणवाडीत पहिल्या दिवशी दि.१.बुधवार रोजी विद्यार्थ्यांना फुले देऊन प्रवेश उत्सव अंगणवाडीत साजरा करण्यात आला आहे. यावेळी नगरसेवक प्रतिनिधी डॉ.विशाल लंगडे, सामाजिक कार्यकर्ते पुरभाजी कानोडे, प्रा. नंदकिशोर कल्याणकर, पत्रकार सखाराम क्षीरसागर, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष संदिप राऊत यांच्यासह पालक, महिला व बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रवेश उत्सव दिन यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका सिमा धोत्रे, मदतनीस महानंदा सौदागर, वनीताबाई बारसे, कुसुम गोस्वामी, आरती दळवे यांनी परिश्रम घेतले. दासनगर मध्ये अंगणवाडी क्रमांक १२ मध्ये प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नगरपंचायत गटनेते बाबुराव लंगडे, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. वर्षाताई बंडाळे आदींच्या उपस्थितीत बालकांना गणवेशात पाठवून स्वच्छतेविषयी विद्यार्थी पालक यांना सूचना देण्यात आल्या. यावेळी अंगणवाडी सेविका शिवनंदा टोम्पे, पालक वर्ग वर्षा मुकाडे, ज्योती लंगडे, स्वाती, गीता, भागीरथ मटे, राधिका, अश्विनी, प्रिया, चंदा गंजे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.