आ.बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातील नागरिकांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

कै.देविदासराव कल्याणकर यांच्या स्मरणार्थ तरोडा खु. येथील प्रवेशद्वाराचे लोकार्पण तसेच किर्तन महोत्सवास अलोट गर्दी

651

नांदेड –

नांदेड उत्तरचे आ.बालाजी कल्याणकर यांचा स्वभाव मितभाषी असून त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे अनेक जण आहेत. त्यांचा आज 1 जून बुधवार रोजी वाढदिवस उत्साहात पार पडला, त्यानिमित्ताने त्यांच्यावर सर्व स्तरातील नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी आ.बालाजी कल्याणकर यांचे वडील कै. देविदासराव भुजंगराव कल्याणकर यांच्या स्मरणार्थ तरोडा खु. मुळगाव येथे उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे मान्यवरांच्या हस्ते फित कापून लोकार्पण देखील करण्यात आले. या निमित्ताने आ.बालाजी कल्याणकर यांनी भक्ती लॉन्स येथे ह.भ.प.बाळु महाराज गिरगावकर यांच्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले होते, त्यास नागरिकांची आलोट गर्दी झाली होती.

या कार्यक्रमास शिवसेना संपर्क प्रमुख आनंद जाधव,खा. हेमंतभाऊ पाटील,मंहत जिवनदास महाराज, आ. बालाजी कल्याणकर,गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील,शिवालय अर्बनच्या अध्यक्षा संध्याताई कल्याणकर, गोविंद गुरु, गरुडदास महाराज, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आनंदराव पाटील बोंढारकर, मनोज राज भंडारी, भुजंग पाटील, धोडु दादा पाटील, प्रकाश मारावार, निखील लातुरकर, जयंवत कदम, उध्दव शिंदे, नेताजी भोसले, सचिन किसवे, पप्पु जाधव, तुलजेश यादव, अशोक उमरेकर, माधव पावडे, गजानन कदम, व्यंकटेश मामीलवाड, नारायण कदम व नांदेड उत्तर मतदारसंघातील सर्व सरपंच – उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, तटांमुक्ती अध्यक्ष, चेअरमन यांच्यासह राजकीय, सामाजिक, धार्मिक, प्रशासकीय क्षेत्रातील अन्य मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते.

आ.बालाजी कल्याणकर हे नेहमीच प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होत असतात. सहज उपलब्ध होणारा आमदार म्हणून त्यांची जनमाणसात ओळख आहे.त्यामुळे त्यांच्यावर देखील जीव लावणारे विविध क्षेत्रात अनेक जण आहेत. आज 1 जून बुधवार रोजी त्यांचा वाढदिवस. या दिवसाचे औचित्य साधून आ.बालाजी कल्याणकर यांनी वडील कै.देविदासराव भुजंगराव कल्याणकर यांच्या स्मरणार्थ तरोडा खु.मुळगाव येथे प्रवेश द्वाराचे लोकार्पण संपर्कप्रमुख आनंद जाधव व महंत जिवनदास महाराज यांच्या हस्ते केले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. याच निमित्ताने आ.बालाजी कल्याणकर यांनी मालेगाव रोडवरील भक्ती लॉन्स येथे ह.भ.प.बाळु महाराज गिरगावकर यांचा भव्य कीर्तन महोत्सव आयोजित केला होता. या कीर्तन महोत्सवात परिसरातील भजनी, टाळकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य यांच्यासह वारकरी संप्रदायातील मंडळी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.या कीर्तन महोत्सवास नागरिकांनी आलोट गर्दी केली होती.

या कीर्तन महोत्सवात प्रास्ताविक भाषण करताना आ.बालाजी कल्याणकर यांनी आपले वडील कै. देविदासराव कल्याणकर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. माझे वडील हे वारकरी संप्रदायातील होते, ते एक कष्टकरी शेतकरी होते. त्याबरोबरच त्यांनी काही काळ मिलमध्ये देखील नोकरी केली. यावेळी बोलताना आ. कल्याणकर भावूक झाले होते. वडिलांना आता मी जनतेत बघतो. जनतादेखील माझ्यावर जिवापाड प्रेम करते, त्यामुळेच मला विकासकामांबाबत एक नवीन ऊर्जा मिळते.माझ्या माध्यमातून दोन्ही तरोड्याचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे.तसेच पुढील काळात देखील मी या दोन्ही तरोड्यासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी खेचून आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खा.हेमंतभाऊ पाटील यांनी देखील देखील आपल्या भाषणात आ.बालाजी कल्याणकर हे नगरसेवक असताना ज्याप्रकारे सकाळी पाचला उठून नागरिकांच्या भेटीगाठी घ्यायचे, त्यांच्या समस्या जाणुन घ्यायचे त्याप्रकारे आमदार असतानादेखील आ.बालाजी कल्याणकर सकाळी पाचला उठून नागरिकांच्या समस्या जाणुन त्या सोडवतात. यामुळेच आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. यानंतर संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी देखील आ.बालाजी कल्याणकर यांच्या पाठीशी आज वडील जरी नसले तर, नांदेड उत्तर मतदारसंघातील जनता त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. किर्तन महोत्सवानंतर आ.बालाजी कल्याणकर यांच्यावर सर्व स्तरातील नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. त्याबरोबर आ. बालाजी कल्याणकर यांना आ. मोहनअण्णा हंबर्डे यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. त्या बरोबरच जिल्हाभरातील इतर सर्व पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आमदार कल्याणकर यांना दिल्या शुभेच्छा

शिवसेनेचे आ.बालाजी कल्याणकर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच युवा सेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांनी फोन करून आ.बालाजी कल्याणकर यांना वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.