संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेच्या वतीने संगीत सूर्यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन.

86

नायगाव, नांदेड |

भगवान शेवाळे

संगीत सूर्य केशवराव भोसले यांचा 101 वा स्मृतिदिन मराठा सेवा संघ प्रणित संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद जिल्हा नांदेडच्या वतीने दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता हॉटेल ताज पाटील येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे असे संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे पणतू शिवश्री अशोक पाटील, कोल्हापूर यांचं मार्गदर्शन ऐकायला मिळणार आहे तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष सांस्कृतिक परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष शिवमती वर्षाताई धाबे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार, प्रदेश उपाध्यक्ष शिवश्री प्रकाश लेणेकर, प्रदेश महासचिव प्रमिलाताई भिसे, प्रदेश कार्याध्यक्ष अजित शिरोळे, अर्थ व सहकार कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सोपान मामा क्षीरसागर, मराठा सेवा संघ जिल्हा नांदेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री नानाराव कल्याणकर, उद्धवराव सूर्यवंशी या व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा अभिवादन सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील विविध कलाकारांचं सादरीकरण मंचावर होणार आहे. सर्वप्रथम संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा अभिवादनाचा कार्यक्रम व त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील विविध कलावंतांचा अनोखा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होईल अशी माहिती परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.शिवराज शिंदे, प्रा विनोद राणे, अजय शेवाळे यांनी दिली आहे. या कार्यक्रमासाठी सर्व रसिक प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.