‘आयआयबी’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयआयबी इन्स्पायर व्याख्यानाचे आयोजन; प्रा.नितीन बानुगडे पाटील करणार मार्गदर्शन

328

नांदेड / लातूर –

मेडिकल प्रवेशासाठी अग्रगण्य संस्था असलेल्या आयआयबीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयआयबी इन्स्पायर व्याख्यानाचे आयोजन येत्या २७ नोव्हेंबर रविवार रोजी नांदेड व लातूर या दोन्ही ठिकाणी करण्यात आले असून विद्यार्थी कसा असावा व त्याने स्पर्धेला कसे सामोरं जावे यासह विद्यार्थ्यांशी निगडीत अशा अनेक विषयावर प्रबोधनकार, इतिहास अभ्यासक, लेखक, प्रेरणादायी वक्ते प्रा.नितीन बानगुडे पाटील मार्गर्शन करणार असल्याची माहीती आयआयबीच्या वतीने देण्यात आली आहे.

आजच्या अटीतटीच्या वेगवान स्पर्धेच्या काळात आपला विद्यार्थी टिकावा तसेच त्याच्यावर समाजशील संस्कार व्हावेत या हेतूने मागील दोन दशकापेक्षा जास्त काळापासून आयआयबीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या मनावर आणि करीअरवर संस्कार घडवणाऱ्या मार्गदर्शन व प्रोत्साहनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच वाटचालीत श्री.प्रकाश बाबा आमटे तसेच ग्लोबल टिचर रणजित डिसले यांनी मागील वर्षी आयआयबीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.

विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानत सुरू असलेल्या आयआयबीच्या वाटचालीतील हा एक महत्वपूर्ण असा मार्गदर्शनपर कार्यक्रम असून यात श्री बानगुडे पाटील हे विदयार्थ्यांना त्यांच्याशी निगडीत अशा विविध विषयावर मार्गदर्शन करणार असून या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन टिम आयआयबीच्या वतीने करण्यात आले आहे.

            ‘IIB INSPIRE’ विद्यार्थ्यांच्या आयुष्याला                            कलाटणी देणारे व्याख्यान

प्रा.नितीन बानुगडे पाटील, प्रबोधनकार, इतिहास अभ्यासक, लेखक, व प्रेरणादायी वक्ते

नांदेड- रविवार, २७ नोव्हेंबर २०२२ वेळ: सकाळी ११ वाजता स्थळ: चांदोजी पावडे मंगल कार्यालय, नांदेड

  लातूर- रविवार, २७ नोव्हेंबर २०२२ वेळ : सायंकाळी ६ वाजता स्थळ: मधुमिरा मंगल कार्यालय, लातूर

Leave A Reply

Your email address will not be published.