स्वारातीम विद्यापीठात ‘मराठवाड्यातील लेखन’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

209

नांदेड –

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘मराठवाड्यातील लेखन’ या विषयावर दोन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२९ व ३०मार्च रोजी विद्यापीठातील सिनेट सभागृहात हे चर्चासत्र होईल.

भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने आयोजित या चर्चासत्राचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते होणार आहे.अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले असतील.यावेळी प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, डॉ.अजय टेंगसे, डॉ.अच्युत बन, स्नेहलता स्वामी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या चर्चासत्रात मराठवाड्यातील डॉक्टरांचे मराठी साहित्यात योगदान आणि मराठवाड्यातील स्त्रियांचे साहित्य या विषयासंदर्भाने दोन स्वतंत्र परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय माझ्या आयुष्याची स्मरणयात्रा व गांधारी या ग्रंथावर स्वतंत्र चर्चा आयोजित करण्यात आली आहे. उदघाटन सत्रात कलानुभव (अनुवाद डॉ.शैलजा वाडीकर), माझ्या आयुष्याची स्मरणयात्रा (डॉ.अच्युत बन), गांधारी (स्नेहलता स्वामी) या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.

डॉ.हंसराज वैद्य, डॉ.किशोर अतनुरकर, डॉ.शारदा कदम, सुप्रसिद्ध कवी देविदास फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या निरनिराळ्या सत्रांमध्ये डॉ.राजेश गायकवाड, डॉ. शेख इक्बाल मिन्ने, डॉ.सुजाता जोशी पाटोदेकर, डॉ. नंदकुमार मुलमुले, डॉ.रविंद्र तांबोळी, सुनिता आरळीकर, डॉ.ज्योती कदम, अर्चना डावरे, डॉ.जयद्रथ जाधव, विजय वाकडे, डॉ.लहू वाघमारे, डॉ.सुरेश कदम हे मांडणी करणार आहेत. व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ.वैजयंता पाटील आणि डॉ.दिपक बच्चेवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

दोन दिवस चालणाऱ्या चर्चासत्राचा लाभ नांदेड शहरातील प्राध्यापक, विद्यार्थी, साहित्य अभ्यासक, रसिक यांनी घ्यावा असे आवाहन भाषा संकुलाच्या संचालक डॉ. शैलजा वाडीकर आणि राष्ट्रीय चर्चासत्राचे समन्वयक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.