ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना चालना मिळावी यासाठी स्पर्धेचे आयोजन-जि.प.सदस्य बबनराव बारसे
अर्धापूर, नांदेड –
ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंनी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून नावलौकीकता मिळवावी तसेच जिल्हास्तरीय व राजस्तरीय क्रिकेटमध्ये सहभागी व्हावे यासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे यांनी उदघाटन प्रसंगी बोलतांना दिली.
अर्धापूर तालुक्यातील बामणी येथे शिवजन्मोत्सवा-निमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास उदघाटक म्हणून जि.प.सदस्य बबनराव बारसे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख बालाजी कल्याणकर,उपसभापती अशोक कपाटे, चेअरमन ज्ञानेश्वर राजेगोरे, सरपंच गजानन राजेगोरे, अशोकराव देलमडे, राजू कदम, सरपंच दत्ता दत्ता नादरे, युवा सेनेचे चेतन देशमुख, पत्रकार सखाराम क्षीरसागर, गोविंद टेकाळे, संदीप राऊत आदींच्या उपस्थितीत क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी भारतरत्न गानकोकीळा स्व.लतादीदी मंगेशकर यांना सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेचा ग्रामीण भागातील क्रिकेट पटूनी लाभ घेऊन क्रिकेट मैदान गाजवावे असे आवाहन उपसभापती अशोक कपाटे यांनी यावेळी बोलताना केले आहे. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. प्रथम विजयी झालेल्या संघास २१,१२१ रू, व्दितीय संघास ११,१११ रू ,तृतीय संघास ५,५५५ रू व प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येणार आहे.
क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच सतिश कुमार कदम, शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष पाटील कदम, देविदास कदम, उपसरपंच प्र.मालोजीराव चिंतले, डिंगांबर चिंतले, शंकर कदम, माणिकराव हुडे, सुरेश चिंतले, गजानन चिंतले, अक्षय हुडे, चंद्रकांत कदम, बाळू कदम, अभिमन्यू कदम, आत्माराम कदम, आकाश कदम आदी प्रयत्न करत आहेत.