हदगाव पोलिसांची कामगिरी; चोरट्यास सात तासात मुद्देमालासह अटक

1,211

हदगाव, नांदेड –

दि. 2 मार्च रोजी दिलीप किशनराव कोल्हे, वय 58 वर्षे व्यवसाय सेवानिवृत्त रा.ग्रीन पार्क कॉलनी, हदगाव हे दुपारी 11.30 वा.सुमारास घरात दार बंद करुन जेवन करत होते. त्यावेळी आरोपीने त्यांचे घराचे दार वाजुन दार उघडण्यास सांगितले व महादेवाचा भंडारा आहे. भंडाऱ्यासाठी तांदुळ व दाळ मागितली. त्यास फिर्यादीने त्यांच्या हॉलमध्ये थांबण्यास सांगुन ते घराच्या मधल्या खोलीत जाऊन दाळ व तांदुळ घेण्यास गेले असतांना आरोपीने हॉल मधील टायटन कंपनीचे घडयाळ व पँटच्या खिशातील नगदी रुपये चोरुन घेतले व तांदुळ आणि दाळ घेवुन निघुन गेला.

थोड्यावेळा नंतर फिर्यादी दिलीप कोल्हे यांना टेबलवरील घडयाळ व नगदी रुपये दिसले नाही. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी हदगाव पोलीस स्टेशन गाठले व आरोपी विरुध्द गुन्हा नोंद होताच मा.पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मा.अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रांजनकर उपविभाग भोकर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांचे हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हदगाव यांनी मार्गदर्शन घेऊन गुन्हयाचे तपासिक अमलदार पोहेकॉ विश्वनाथ हंबर्डे यांना तपासाबाबत सुचना देऊन वेगाने चक्र फिरविले व आरोपी नागेश उर्फे मुन्ना राधाकिशन महाजन रा.हदगाव यास सात तासाच्या आत पकडून त्यास जेरबंद केले.

आरोपीस पोलीस हिसका दाखवून त्याच्याकडून चोरुन नेलेला माल घडयाळ व नगदी 3050/- रुपये हस्तगत केले आहे. सदरची कामगिरी पोउपनि संजय गायकवाड, पोहेकॉ विश्वनाथ हंबर्डे, पोना रणवीर, पोकॉ नागनाथ गायकवाड, पोकॉ पाईकराव, पोका बट्टेवार यांनी पार पाडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.