अर्धापूर-नांदेड रोडवर खंजीरचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणा-या २ जणांना पोलीसांनी केली अटक

1,345

अर्धापूर, नांदेड-

शहरातील सनशाईन गार्डन जवळ मोटार सायकल चालकास अडवून खंजीरचा धाक दाखवून मोबाईल व पैसे काढून घेण्याचा प्रयत्न करणा-याला रंगेहाथ पकडले असून दोन आरोपींना पोलीसांच्या हवाली केले आहे. या चोरी प्रकरणी ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्लिक करा आणि हेही वाचा:

नांदेडमद्धे शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी

नांदेड-अर्धापूर रोडवरील मोटार सायकलवर जाणाऱ्यांना अडवून खंजीरचा धाक दाखवून लुट करण्याचा प्रयत्न करणा-याला चोरट्यांना आरडाओरडा करून जनतेने पकडून पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले असून खंजीरचा धाक दाखवून लुट प्रकरणी रियाजखान सपदखान रा.तेहरानगर नांदेड यांच्या फिर्यादी वरून आरोपी १)माधव शंकर राजेगोरे रा शेलगाव २)नवनाथ मारोती जाधव रा.दाभड, ३)नारायण तारडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कपील आगलावे, जमादार नरवाडे, एस.एस.गायकवाड हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.