सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे अर्धापुरचा नगराध्यक्ष निवडीचे सर्व अधिकार

सर्व नगरसेवकांतून एकमुखी मागणी

574
सखाराम क्षीरसागर,
अर्धापूर, नांदेड –

अर्धापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण यांनी कोणत्याही नावाला सहमती दिल्यास सर्वांना मान्य राहील अशी एकमुखी मागणी 11 नगरसेवकांनी आ.अमरनाथ राजूरकर, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी यांच्याकडे लेखी निवेदन दि.1 मंगळवारी रोजी देऊन केली आहे.

नगराध्यक्ष होण्यासाठी इच्छुकांनी लावली जोरदार फिल्डिंग

नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 17 पैकी 10 जागेवर विजय मिळवला तर एकमेव अपक्ष मुक्तेदरखान पठाण यांनी काँग्रेसला पाठिंबा देत काँग्रेसचे संख्याबळ 11 झाले असून नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीसाठी इच्छुकांची बैठक काँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, युवकचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे यांच्या उपस्थितीत सर्व नव निर्वाचित नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण हे ज्या नावाला सहमती देतील तो नगराध्यक्ष आम्हाला मान्य राहील असा ठराव करत 11 नगरसेवकांनी लेखी निवेदनावर सह्या करून अर्धापूर नगरपंचायतींचा नगराध्यक्ष ठरविण्याचे अधिकार बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना दिल्यामुळे ते कोणत्या नावाला सहमती दर्शवतील याकडे अर्धापूरकरांचे लक्ष लागले आहे.

यावेळी सौ.शालीनीताई राजेश्वर शेटे, डॉ.पल्लवीताई विशाल लंगडे, सौ.वैशालीताई प्रविण देशमुख, छत्रपती कानोडे, सोनाजी सरोदे, सौ.मिनाक्षी व्यंकटी राऊत, सायेरा बेगम काजी सल्लावोद्दीन, यास्मिन सुलताना मुस्वीर खतीब, सलीम कुरेशी, नामदेव सरोदे,अपक्ष नगरसेवक मुक्तेदरखान पठाण यांच्यासह अनेक स्विकृत नगरसेक पदासाठी इच्छूक असलेले उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 17 पैकी 10 जागी विजय मिळवत बहुमत प्राप्त केले असून एकमेव अपक्षांनी काँग्रेसला जाहीर पाठींबा दिला असल्याने संख्याबळ 11 वर गेले आहे. नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद “सर्वसाधारणसाठी” आरक्षण सुटले असून अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरुवात केली आहे. अर्धापूर नगर अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे बघण्याची उत्सुकता लागली आहे. अर्धापूर नगरपंचायत निवडणूकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या गटाला १०, तर एमआयएम ३,भाजपा २, राष्ट्रवादी १, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल असून सभागृहात सर्वांना सोबत घेऊन व अर्धापूरला विकासासाठी पुढाकार घेणारा नगराध्यक्ष म्हणून कोणाला संधी मिळणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.