पार्डी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध चेअरमनपदी पंजाबराव देशमुख तर व्हाईस चेअरमनपदी कैलास भांगे

445

अर्धापूर, नांदेड-

तालुक्यातील पार्डी म येथील सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असून, चेअरमनपदी पंजाबराव देशमुख तर व्हाईस चेअरमनपदी कैलास भांगे यांची निवड करण्यात आली, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सभासदांचे आभार मानले.

अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म) येथील संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध निवड झाली, मंगळवारी 31मे ला चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक निवडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ए.एम. केंद्रे व सहाय्यक निवडणूक अधिकारी सखाराम पाटील पवार यांनी विशेष बैठक बोलावली होती. यावेळी चेअरमन पदासाठी पंजाबराव देविदासराव देशमुख तर व्हाईस चेअरमनपदासाठी कैलास विठ्ठलराव भांगे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले, त्यामुळे ही निवडणूक पारंपरिक पध्दतीने बिनविरोध पार पडली.

संचालक मंडळांमध्ये निळकंठराव मदने, मारोतराव देशमुख, विठ्ठलराव देशमुख, नारायणराव देशमुख, मनोज देशमुख, रवी देशमुख, भगवानराव साबळे, शामराव मरकुंदे, सौ.जिजाबाई भाऊराव हापगुंडे, सौ.मंगलाबाई दिगंबरराव भांगे, धोंडीबा गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली.या निवडीचे स्वागत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सदाशिवराव देशमुख, हासनराव मदने, गंगाधर देशमुख, पत्रकार नागोराव भांगे, सटवाराव हापगुंडे, बाबूराव देशमुख, हनुमंत देशमुख, जितेंद्र देशमुख, बाबूराव साबळे, अविनाश देशमुख, शंकर हापगुंडे, नंदकिशोर देशमुख, गणेश शिखरे, शिवाजी देशमुख, श्याम गिरी, ज्ञानेश्वर दहिभांगे, महेश देशमुख, भरत हापगुंडे, बंडू मदने, विठ्ठलराव देशमुख, देविदास कांबळे यांच्यासह आदींनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.