‘कॅन्सर डे’ निमित्ताने रॅली संपन्न; लोटस एज्युकेशनल कॅम्पस व लोटस हॉस्पिटलच्या वतीने आयोजन

96

नांदेड –

येथील लोटस एज्युकेशनल कॅम्पस व लोटस हॉस्पिटलच्या वतीने ‘कॅन्सर डे’ चे औचित्य साधत कॅन्सर या आजारावर प्रकाश टाकणाऱ्या रॅलीचे आयोजन आयटीआय कॉर्नर ते कलेक्टर ऑफिस असे करण्यात आले.

कॅन्सर या आजाराबद्दल प्रबोधन होण्यासाठी आयोजित या रॅलीमध्ये लोटस एज्युकेशनल कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पथनाट्य व एकपात्री नाट्य प्रयोग सादर करत लोकसमूहांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न केला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोटस हॉस्पिटलचे डॉक्टर संजय पडलवार, डॉक्टर आनंद भगत, डॉ.प्रिती कदम, डॉ.जितेंद्र नाथानी, डॉक्टर घाटे, डॉक्टर पाकुलवार तसेच लोटस एज्युकेशनल कॅम्पसचे प्रिन्सिपल श्रीकांत बारटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.