नदीकाठचे स्त्रोत आटले; पशु प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

नदी नाल्यांना पाणी सोडण्याची प्रहारची मागणी.!

381

अर्धापूर, नांदेड-

तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांना पाण्याची टंचाई निर्माण होत आहे.तालुक्यातील नदी-नाले कोरडी पडली असून यामुळे ग्रामपंचायतच्या विहिरी व वन्य प्राण्यासह, जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने इसापूर धरणाचे पाणी नदीनाल्यांना सोडावे अशी मागणी प्रहारचे तालुकाध्यक्ष छगन पाटील सांगोळे यांनी केली आहे.

तालुक्यातील अनेक गावांचा पाणीपुरवठा नदी काठावरील विहिरीवरून होत असतो.तर वन्य प्राण्यांसह, जनावरांनाही पिण्याचे पाणी मिळत नसल्याचे चित्र निर्माण होत आहे. तर अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. तालुक्यातील नदीकाठची अनेक गावे पाणीटंचाईच्या विळख्यात सापडण्याची दाट शक्यता आहे.

इसापुर धरणाचे पाणी अर्धापूर तालुक्यातील पार्डी म.शेनी, देळूब बु.,कामठा बु.,कोंढा, देळूब खु.,बामणी, शेलगाव बु, शेलगाव खु.,पिंपळगाव म.,सांगवी (खडकी)खु.,मेंढला खु.व बु.,निजामपुर वाडी या गावासाठी सोडण्यात येते. पण पाणी न सोडल्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होत आहे. गावोगावी पिण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी नदी-नाल्याशेजारी ग्रा.पं.सार्वजनिक विहीर आहेत. पाणी पातळी खालावल्यामुळे या विहिरीतील पाणी आटले. सद्यस्थितीत विहीरीने तळ गाठण्यास सुरुवात केल्याने आता या विहिरीत पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही.

पाणी टंचाईमुळे गावोगावची जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. येथे त्वरीत इसापुर धरणातील पाणी पुरवठा सोडावा यामुळे परिसरातील बोरवेल- विहीरींच्या पातळीत वाढ होईल व पाणी टंचाईचा प्रश्न सुटेल या मागणीचे निवेदन तहसिलदार अर्धापूर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, कार्यकारी अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र.एक नांदेड यांना प्रहारचे तालुकाध्यक्ष छगन पा सांगोळे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.