नांदेडमद्धे आरटीओ विभागाकडून 36 ई-बाईक्सची तपासणी, एकूण 8 इलेक्ट्रिक बाईकमद्धे आढळले दोष; तर 4 इलेक्ट्रिक बाईक जप्त  

749

नांदेड –

प्रादेशिक परिवहन कार्यालय वायुवेग पथकाने नांदेड शहरातील रस्त्यावर धावणाऱ्या 36 ई-बाईक्सची तपासणी दि. 23 व 24 मे रोजी केली. यावेळी 8 वाहने दोषी आढळून आले असून त्यापैकी 4 वाहने जप्त केली आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

वाहन उत्पादक, वितरक आणि नागरिकांनी ई-बाईक्स वाहनात अनधिकृत बदल करू नये. अशा वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल केले असल्यास ते त्वरीत पूर्ववत करावेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात विशेष तपासणी मोहिम दि.26 व 27 मे 2022 रोजी राबविण्यात येणार आहे. दोषी आढळल्यास संबंधित वाहन उत्पादक, वाहन वितरक व वाहन धारकाविरुध्द मोटार वाहन कायदा 1988 तसेच भारतीय दंड संहिता अंतर्गत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करता येईल.

तसेच ज्या वाहन वितरकांनी ई-बाईक्सच्या विक्रीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडकडून व्यवसाय प्रमाणपत्र प्राप्त केले नाही त्यांनी लवकरात-लवकर व्यवसाय प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.