अर्धापुरातील चोरंबा येथील खंडेश्र्वर यात्रेत बैलगाड्या (शंकरपटाच्या) लक्षवेधी लढतीत समीक्षा वानखेडे प्रथम

विविध स्पर्धेत लाखोंची बक्षीसे

1,250

अर्धापूर, नांदेड-

जिल्ह्यात विविध कारणांनी बहुचर्चित असलेली चोरंबा ता.अर्धापूर येथील खंडोबाची यात्रा बैलगाड्या शंकरपट, डान्स स्पर्धा, कबड्डी, कुस्ती यासह पालखी शेडींने ओढण्याची मिरवणूक सोहळा गावकऱ्यांच्या एकजूटीने दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर झालेल्या यंदाच्या यात्रेला परीसरातून मोठा प्रतिसाद मिळाला त्यामुळे यावर्षीची खंडोबा यात्रा यशस्वी झाली.

अर्धापूर तालुक्यातील चोरंबा (ना)येथे ऐतिहासिक खंडोबा मंदीर आहे.चार दिवसाच्या यात्रेदरम्यान या गावातील व्यक्ती चार दिवस गावाच्या बाहेर जात नाही व नवसाला पावणाऱ्या व्यक्ती पालखी सोहळ्याला आपल्या डोक्यावरील शेंडीने गाडी ओढतात,अशी आख्यायिका आहे. बैल भंडाऱ्याची उधळण करीत खंडोबाच्या जयघोषात पालखी सोहळा संपन्न झाला.

यावेळी डान्स स्पर्धेचे आयोजन यशस्वीरीत्या करण्यात आले होते. कबड्डी, कुस्ती याला मोठा प्रतिसाद मिळाला. कबड्डी स्पर्धेत प्रथम बक्षीस २१ हजार रुपये आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिले, ७ हजार रुपये सरचिटणीस संजय देशमुख लहानकर यांनी दिले, डान्स स्पर्धेला प्रथम बक्षीस भुजंगराव कानोडे यांनी ७ हजार रुपये तर द्वितीय बक्षीस डॉ.राजेश बाजगीरे यांनी ५ हजार रुपये दिले.कुस्तीचे प्रथम बक्षीस तालुकाध्यक्ष आनंदराव भंडारे यांनी ५५५१ रुपये दिले. १४ वर्षांनंतर शंकरपटावर बंदी उठविल्यामुळे शंकरपटात नांदेड, हिंगोली, वाशीम, यवतमाळ, परभणी येथील बैलगाड्या शंकरपट शौकीनांनी आपल्या बैलजोड्या स्पर्धेत सहभाग घेतला. बैलगाड्या शंकरपटाचे जनार्ध़न मंदाडे यांनी स्कोअर पाहिला.

जि.प.सदस्य गंगाप्रसाद काकडे यांनी २१ हजारांचे प्रथम बक्षीस दिले, यावेळी दिलीपराव देबगुंडे, निळकंठ पाटील, गीरजाराव नरोटे, यांनी ही बक्षीस दिले.शंकरपटाच्या स्पर्धेत समीक्षा पाटील वानखेडे रा.वरुडी यांच्या जोडीने ५ सेकंद २४ पाईन्ट मिळवून प्रथम पारितोषिक जिल्हा सचिव निळकंठ मदने, सरपंच गीरजाराव नरोटे, माजी सरपंच डॉ.राजेश बाजगीरे, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, यावेळी चेअरमन बालासाहेब देशमुख, बालाप्रसाद आबुके, हनुमंत देशमुख, गोरखनाथ कस्तुरे, सुभाष नरोटे, प्रदीप पाटील नरोटे, भैय्या पाटील आबूके, राज पाटील आवगते, आबूके,पो.पा.अंजानराव नरोटे, सखाराम पाटील,भुजंगराव कानोडे, माधव लांडगे, माधव देशमुख, प्रा.सुनिल नरोटे, माधव कानोडे, दिलीप नरे, अशोक बाचेवार, आकाश गीरी, लोभाजी कानोडे, ग्यानबा सोनटक्के, देवीदास नरोटे, माऊली कानोडे, शेख हुजूरसाब,भगवान बहादुरे, किसन लिंगायत, केशव पांचाळ, हैसाजी, कुचरु आवडते यांच्यासह सर्व गावकऱ्यांनी यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. यात्रेस पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.