उद्या अंगारकी चतुर्थी निमित्त सत्य गणपती मंदीर प्रशासनाकडून जय्यत तयारी; मंदिराचा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत

लाखो भाविक सत्य गणपतीच्या दर्शनाला उपस्थित राहण्याची शक्यता

1,322

अर्धापूर, नांदेड-

मराठवाड्यातील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या नांदेड अर्धापूर रस्त्यावरील दाभड येथील सत्य गणपती मंदिर समितीच्या वतीने मंगळवारी दि.१९ एप्रिल रोजी येणाऱ्या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने जय्यत तयारी सुरू केली आहे. महसूल व पोलीस प्रशासन गणेश भक्तांना दर्शन सुलभ होण्यासाठी विशेष व्यवस्था करीत आहे.

नांदेड अर्धापूर रस्त्यावरील दाभड (भोकरफाटा) परिसरातील सत्य गणपती देवस्थान एक जागृत देवस्थान म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. येथील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला गणेश भक्तांची खूप मोठी गर्दी होत असते. यावेळी अंगारकी चतुर्थी असल्याने देवस्थान, महसूल व पोलीस प्रशासन विशेष व्यवस्था करीत आहे. सावलीसाठी मंडप, दर्शनी रांगा, दर्शनी मार्ग केला असून विशेष दर्शन रांग ठेवण्यात येणार नाही, मोफत दर्शनाची व्यवस्था केली असून सर्वांना एकाच रांगेत दर्शन घ्यावे लागणार आहे.

गणेश भक्तांना मंदिराच्या कमानी पासून दर्शनाला रांगेत जावे लागणार आहे. दर्शन रांगेच्या दोन्ही बाजूने संरक्षक कठडे लावण्यात येणार आहेत. दर्शन झाल्यावर मंदिराच्या उजव्या बाजूने भक्तांना बाहेर पडावे लागणार आहे. तर बाहेर गावाहून येणाऱ्या भाविक भक्तांच्या वाहनासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.अशी माहिती तहसीलदार उज्वला पांगरकर, नायब तहसीलदार मारोतराव जगताप, सुनिल मालेवाडी व तहसील प्रशासन व सत्य गणपती मंदिर यांना गणेश भक्तांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.