गटशिक्षणाधिकारी डॉ.डी.एस.मठपती यांची सहाय्यक शिक्षण संचालकपदी निवड

283

भोकर, नांदेड-

भोकरच्या पंचायत समिती कार्यालयात कार्यरत गटशिक्षणाधिकारी डॉ.दत्तात्रय शिवलिंगप्पा मठपती यांची लातूर येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात सहाय्यक शिक्षण संचालक म्हणून पदोन्नतीने निवड करण्यात आले असल्याचे आदेश (दि.२३) जिल्हा परिषद नांदेड येथे प्राप्त झाले आहे.

उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना शासनाकडून नुकतीच पदोन्नती देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या विशेष अनुमती याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून या पदोन्नत्या तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आल्या आहेत. राज्यातील ५२ अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या करण्यात आल्या असून यात नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील पंचायत समिती कार्यालयातील गटशिक्षणाधिकारी डॉ.मठपती यांचा समावेश आहे.

इतर मागास प्रवर्गातील ही पदोन्नती असून सहाय्यक शिक्षण संचालक म्हणून त्यांना पदोन्नती देण्यात आली.दरम्यान, शिक्षण विभागातील या महत्वाच्या जागी मठपती यांची निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.