सिंध सेवा संगमच्या महिला शाखा महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी डॉ.सान्वी जेठवाणी यांची निवड

महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष तान्या भागवानी यांनी केली नियुक्ती

583

नांदेड –

जीए सिंध सेवा संगम ही राष्ट्रीय सामाजिक संस्था सिंधी समाजाच्या हितासाठी काम करणारी मध्यप्रदेशला पहिली शाखा सुरुवात करून आज देशभर आपले काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमाने सिंधी भाषा विकास करून सिंधी संस्कृतीचे जतन करणे व सिंधी समाजाचा प्रसार व्हावा व समाज हितासाठी काम करण्याचं उद्दिष्ट ठेवून ही संस्था विविध राज्यांमध्ये आपली शाखा चालवत आहे.

यात महाराष्ट्र राज्याचे महिला शाखेमध्ये प्रदेश सचिव म्हणून नांदेड येथील सिंधी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व व नांदेड येथील सुप्रसिद्ध कलावंत डॉ.सान्वी जेठवाणी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती 2022 पर्यंत करण्यात आली असून महिला संघटना करून सिंधी समाजाला प्रेरित करण्याचं काम यांच्या माध्यमाने व्हावं या हेतूने त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र महिला शाखेच्या राज्य अध्यक्षा तान्या मनोज खत्री, संजना खत्री, पल्लवी पुरश्वानी, गीता गोगिया, संस्थेच्या संस्थापक वर्षा गजारा, सोनिया खत्री, संजना खत्री यांच्या संमतीने सिंधी समाजाची प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची निवड करण्यात आली.

सान्वी जेठवाणी यांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रीत नानकानी, राष्ट्रीय सरचिटणीस खुशी टेकचंदानी यांनी अभिनंदन केले आहे आणि आनंद व्यक्त केला आहे.सान्वी जेठवाणी यांच्या नियुक्तीबद्दल महिला संघाने अभिनंदन केले असून मध्य प्रदेशातील सर्व महिला शाखा अध्यक्षांनी अभिनंदन केले. महिला होऊन काही महिने झाले असताना एवढी मोठी जबाबदारी आपल्याला मिळाली असल्याचे आनंद देखील आहे पण तेवढेच जबाबदारीने मी हे काम करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.