मारोती सवंडकर यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ च्या नांदेड जिल्हा संघटक पदी निवड
नांदेड –
दै.उद्याच्या मराठवाड्याचे श्री मारोती सवंडकर यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या नांदेड जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शना- खाली राज्यात पत्रकारांचे संघटन बांधणीसाठी काम सुरू आहे. त्यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले यांनी नांदेड जिल्हा संघटक पदी श्री मारोती सवंडकर यांची निवड केली आहे. या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.