सुभाष लोणे, दिगांबर मोळके यांची अनु.जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध समितीवर निवड
अर्धापूर, नांदेड –
महाराष्ट्र शासन सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार, नांदेड उपविभागीय स्तरावर अनु.जाती/अनु.जमाती अत्याचार प्रतिबंध करीता दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये एकूण बारा सदस्याची नियुक्ती करण्यात आली आहे.पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस सुभाष लोणे, पत्रकार दिगांबर मोळके यांची समितीवर शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.
शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णयानुसार उपविभागीय स्तरावर दक्षता व नियंत्रण समिती अनु.जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणून कार्य केले जाते. विकास माने उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत असून उपविभागीय पोलिस अधिकारी तथा तहसिलदार, अनु.जाती – अनु.जमाती पंचायत समिती सदस्य, केंद्र शासनाने नामनिर्देशित केलेले सामाजिक कार्यकर्ता असे एकूण बारा सदस्यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
सुभाष लोणे, दिगांबर मोळके यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा सरचिटणीस संजयराव लहानकर, तालुकाध्यक्ष बालाजीराव गव्हाणे, सचिव निळकंठ मदने, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, पंडितराव लंगडे, संचालक संजय लोणे यांच्यासह अनेकांनी निवडीबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.