शासनाच्या अभ्यास गटावर तलाठी गाढे यांची निवड

697
नांदेड

नांदेड शहरातील वजिराबाद सज्जाचे तलाठी नारायण रावसाहेब गाढे यांची शासनाच्या अभ्यास गटावर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या सेवाज्येष्ठता सूचीत एकसूत्रता आणण्याकरिता निश्चित काय कार्यपद्धती असावी, याविषयीचा अहवाल व त्यासंदर्भातील शिफारशी सादर करण्यासाठी कोकण विभागीय उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली ‘अभ्यास’ गट स्थापन करण्यात आला आहे. या अभ्यास गटात अमरावती व औरंगाबाद येथील निवासी उपजिल्हाधिकारी व मंडळ अधिकारी (नागपूर) तसेच कोल्‍हापूर येथील तलाठी यांच्यासह उपरोक्त अभ्यास गटाचे सदस्य म्हणून नांदेड शहरातील वजिराबाद सज्जाचे तलाठी एन. आर. गाढे यांची नियुक्ती महसूल व वन विभागाने शासन निर्णयाद्वारे करण्यात आली आहे.

तलाठी नारायण गाढे यांच्या निवडीबद्दल उप विभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार किरण अंबेकर यांच्यासह मंडळ अधिकारी अनिरूध्द जोंधळे, हयुम पठाण, अनिल धुळगंडे व गजानन नांदेडकर आणि तलाठी प्रदीप उबाळे पाटील, प्रकाश कांबळे, बा. तु. भराडे, दिगांबर देशमुख व सुदर्शन गजभारे आदींनी स्वागत करून तलाठी गाढे यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.