हदगाव ग्रामसेवक संघटना तालुका अध्यक्षपदी शिवाजी कदम तर सचिव पदी रमेशराव मोपडे यांची एकमताने निवड
हदगाव, नांदेड –
हदगाव तालुक्यातील ग्रामसेवक संघटनाच्या तालुका अध्यक्षपदी शिवाजीराव कदम यांची एकमताने अध्यक्ष म्हणुन निवड मतदान पध्दतीने झाली आहे. त्यांच्याविरुध्द आंनद शेळके हे होते. एकूण 135 ग्रामपंचायत असुन त्यामध्ये एकूण 76 सभासदांनी मतदानाचे हक्क बजाविले आहे. तर या मतदानामध्ये अध्यक्षाच्या स्पर्धेत असलेले दोन ग्रामसेवक उभे होते. त्यामध्ये शिवाजीराव कदम यांना 58 मते मिळून विजय प्राप्त केल्याबदल सर्व ग्रामसेवकांमधून आंनद व्यक्त होत आहे. तसेच तालुका सचिव स्पर्धेत रमेशराव मोपडे हे सुध्दा प्रतिस्पर्धी 59 मताने विजय प्राप्त केले आहे. यांच्या निवडीचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केशव गड्डापोड यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिव यांचे शाल व श्रीफळ देऊन चांगल्या कार्यास शुभेच्छा दिल्या. या वेळेस जिल्हा अध्यक्ष व जिल्हासचिव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे. तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांकडून अध्यक्ष व सचिव निवडीचे स्वागत होत आहे.