धक्कादायक ! अबब.. जेवणात निघाल्या चक्क अळ्या..! नायगांव येथील मागासवर्गीय वसतिगृहातील प्रकार ( पाहा, व्हिडिओ बातमी )

1,134

भगवान शेवाळे

नायगाव, नांदेड –

नायगाव येथील मागासवर्गीय वसतिगृहातील मुलांच्या जेवणामध्ये चक्क आळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वारंवार देण्यात येणाऱ्या निकृष्ट जेवणाला कंटाळुन वसतिगृहातील मुलांनी तहसील कार्यालयाकडे धाव घेतली परंतु तेथील अधिकाऱ्यांनी हा आमचा विभाग नाहीये संबंधित विभागाकडे जाऊन तक्रार करा अस सांगितल्याने मुलं तिथून निघून गेली परंतु हा सर्व प्रकार पाहता सामाजिक न्याय विभाग आता काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.

मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या मुलांना शिक्षणाची चांगली सोय व्हावी, यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत राज्यात मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय वसतिगृहे १९९२ साली सुरू करण्यात आली. यात इतर सोयीसुविधा सह निवास व भोजनाची व्यवस्था मोफत करण्यात येते.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुुक्यात याच विभागांतर्गत येणारे एक शासकीय वसतिगृह २०११-१२ साली सुरू करण्यात आले आहे.परंतु, या वसतिगृहात अतिशय निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याची तक्रार येथील विद्यार्थ्यांनी केली आहे.भाज्या करपलेल्या, डाळीचा कमी वापर असेलेलं निव्वळ पाण्यासारखं वरण, भाज्यात अळ्या देखील निघतात आम्ही याकडे दुर्लक्ष केलं होतं परंतु हे प्रमाण काही कमी होताना दिसून येत नाही. त्यामुळे त्रस्त होऊन आम्ही तहसील कार्यालयात गेलो परंतु हा विभाग आमच्या अंतर्गत येत नाही संबंधित विभागाकडे जा असे सांगितल्याने आम्ही माघारी झालो असल्याची भावना विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे हा प्रकार लक्षात घेता संबंधित विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे याची त्वरित चौकशी करून यात जो कोणी दोषी आढळेल त्याविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.