नांदेड पोलीस दलातील भरती प्रक्रियेत धक्कादायक प्रकार, तरुणाने घेतले उत्तेजक द्रव्य, उमेदवारावर अपात्रतेची कार्यवाही

2,204

नांदेड –

नांदेडमद्धे  दि.2 जानेवारीपासून सुरू असलेल्या जिल्हा पोलीस दलाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आलेल्या एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य असलेले इंजेक्शन व औषध सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. भरतीत सहभागी होण्यापूर्वी उत्तेजक द्रव्ये घेण्याचा या तरुणाचा प्रयत्न होता, अशी माहिती उघड झाली आहे. या उमेदवाराचे अद्याप नाव स्पष्ट झालेले नाही. मात्र, या तरुणाला पोलीस भरतीतून अपात्र करून योग्य ती कार्यवाही सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदेडमद्धे दि. 02 जानेवारी पासून पोलीस दलाची भरती प्रक्रिया चालू असून सदरची प्रक्रिया ही दररोज सकाळी 5 वाजेपासून पोलीस मुख्यालय नांदेड येथे सुरू आहे. दि.6 जानेवारी रोजी 6 वाजेच्या सुमारास उमेदवाराचे अर्ज छाननी करून कागदपत्र तपासुन पुढील भरती प्रक्रिया सुरू असताना बायोमॅट्रीक चाचणी पुर्ण करून उमेदवारांना मुख्य मैदानात सोडण्याची प्रक्रिया सुरू होती.

मात्र, याचवेळी एक उमेदवार लघुशंकेचे कारण सांगून बाथरूमकडे गेला. त्यावेळी बाजूस बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोउपनि डाकेवाड व सोबतचे पाच अंमलदार यांना सदर उमेदवारांचा संशय आल्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवून तपासणी केली असता त्याच्याजवळ 1 इंजेक्शनची सिरींज आणि ऑक्सीबुस्टर नावाचे औषधाची बॉटल आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर उमेदवारास भरती प्रमुखाकडे हजर केले असता. भरती कमिटीच्या प्रमुखाने सदर उमेदवाराला भरती प्रक्रियेतून अपात्र ठरवून त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवार व पोलीस दलामद्धे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पोलीस विभाग तर्फे आवाहन करण्यात येते की, पोलीस भरती प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांनी पोलीस भरतीस येते वेळेस कोणतेही संशयास्पद, उत्तेजनार्थ द्रव्य घेवु नये किंवा सोबत बाळगु नये. सर्व उमेदवारांची बायोमॅट्रीक व मॅन्युअली तपासणी करून पुढील भरती प्रक्रियामध्ये उमेदवारांना सोडण्यात येत आहे. अचानकपणे कोणत्याही उमेदवारांचे रक्ताचे नमुने, लघवीचे नमुने घेण्यात येत असुन त्यांच्या रक्त किंवा लघवीच्या नमुन्यामध्ये काही संशयित घटक आढळुन आल्यास त्या उमेदवारास पोलीस भरती करीता अपात्र ठरविण्यात येईल याची नोंद घेण्याचे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.