धक्कादायक बातमी ! 17 वर्षीय गर्भवती तरुणीने चक्क युट्युबवरील व्हिडिओ पाहून केला गर्भपात
नागपूर –
नागपुरमद्धे एका 17 वर्षीय तरुणीने पाच महिन्याची गरोदर राहिल्यानंतर चक्क युट्यूबवर व्हिडीओ पाहून गर्भपात केला. मात्र प्रकृती बिघडून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे.
नागपूर तालुक्यातील एका गावातील हे प्रकरण आहे. 17 वर्षीय मुलीचे एका 27 वर्षाच्या युवकासोबत प्रेम संबंध होते. दोन वर्षांपासून त्यांचे प्रेम प्रकरण सुरू असल्याची माहिती आहे.वर्षभरापूर्वी तो युवक नागपुरात कामानिमित्त एमआयडीसी परिसरात भाड्याने खोली करून राहू लागला.त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी कमी झाल्या.तरीही ते संधी मिळेल तेंव्हा भेटत होते. कधी-कधी हा युवक प्रेयसीला भेटायला नरखेडला जात असे, तर कधी ती तरुणी नागपूरला येत असे. काही दिवसांपूर्वी ती नागपूरला युवकास भेटायला आली. त्यावेळी त्यांच्यात जवळीकता निर्माण होवून काही दिवसांनी तिला गर्भधारणा होवून मळमळ, उलटीचा त्रास सुरू झाला.
गर्भपात करण्यासाठी चक्क युट्यूबवरील व्हिडीओचा केला वापर
दरम्यान, गर्भधारणा झाल्याचं मुलीच्या लक्षात आल्यानंतर तिने आपल्या प्रियकरास सांगितले. तो रुग्णालयात काम करत असल्याने त्याने काही औषधे तिला सांगितली. तिने ती औषध खाल्ली पण, औषधांचा काहीही परिणाम झाला नाही. ती चार-पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं कळल्यावर घाबरून गेली. शेवटी काय करावे यासाठी गर्भपात कसा करतात ? यासाठी तिने युट्युबवर गर्भपाता- संबंधी काही व्हिडीओ पाहून माहिती घेतली.
ते पाहून युट्यूबवर मुलीला काही गावठी आयुर्वेदिक औषधांची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे तिने घरीच काढा तयार केला आणि तो सेवन केला त्यामुळे तिचा गर्भपात झाला व घरीच मुलगी बेशुद्ध पडली. तिच्या बाजूला चार-पाच महिन्यांचे अर्भक होते. पालकांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणाची माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. युवकाविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांनी हे प्रकरण आता एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केले असून पोलीस तिच्या प्रियकराचा शोधात आहेत