धक्कादायक बातमी ! नांदेड शहरातील रेल्वे स्थानकासमोरील पंजाब लॉजमद्धे भोकरच्या महिला डॉक्टरची आत्महत्या

गळा व हाताची नस कापून केली आत्महत्या

5,895

नांदेड –

शहरात एका महिला डॉक्टरने रेल्वेस्थानकासमोरील पंजाब लॉजमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि.24 मार्चच्या सायंकाळी उघडकीस आली.या प्रकरणी आकस्मिक मृत्यू नोंद करण्याची प्रक्रिया वजिराबाद पोलीस स्थानकात सुरू होती.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, डॉ.विद्या अमोल सुंकवाड, वय 33 या महिला डॉक्टरने काल दि.22 मार्च रोजी रेल्वे स्थानकासमोरील पंजाब लॉजमध्ये एक खोली स्वतःच्या नावावर घेतली व दि.23 मार्च रोजी सकाळी उठून बाहेर गेली. आणि पुन्हा लॉजच्या आपल्या खोलीत येऊन थांबली. मात्र आज दि.24 मार्च रोजी ती सकाळी उठलीच नाही, तिने आपल्या रुमचे दार उघडले नाही म्हणून पंजाब लॉजच्या व्यवस्थापनाने बाहेरून दार वाजविले. तेंव्हा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळानंतर पुन्हा एकदा लॉज व्यवस्थापनाने खोलीचे दार वाजविले परंतू, तरीही काहीच प्रतिसाद मिळाला नाही.त्यानंतर पंजाब लॉज व्यवस्थापनाने वजिराबाद पोलीसांना याबाबत माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, त्यांचे सहकारी अधिकारी, पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले. पोलीसांनी खोलीचे दार तोडून उघडले तेंव्हा पोलिसांना महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिच्या मृतदेहाजवळ एक बॅग होती. त्यात नवीन नॉयलॉन दोरी, औषधी गोळ्या तसेच तिच्या शरीरावर कटरने जखमा केलेल्या आढळून आल्या. तिच्या गळ्याची व हाताची नस कापलेली असून कटर मयत डॉक्टरच्या हातातच असल्याचे पोलिसांना प्रथम दर्शनी आढळले.

मिळालेल्या माहितीनुसार डॉ.विद्या सुंकवाड यांचे पती भोकर येथे डॉक्टर आहेत. डॉक्टर पती-पत्नी भोकर येथे राहत असून त्यांना 5 ते 6 वर्षाचा मुलगा आहे. डॉ.विद्याची आई, आजोबा आणि भाऊ शहरातील फरांदेनगर भागात राहतात. बातमी लिहिपर्यंत या प्रकरणी आकस्मिक मृत्यू नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तरी वजिराबाद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. दरम्यान महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.