धक्कादायक बातमी ! संपत्ती वाटणीच्या कारणावरून व्हिडिओ व्हायरल करून केली आत्महत्या; नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील घटना
मुखेड, नांदेड-
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हिब्बट येथील रमाकांत हनुमंत कागणे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ व्हायरल करून शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आज गुरुवार दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता ही घटना उघडकीस आली.
आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ 👆🏼
मुखेड तालुक्यातील हिब्बट गावातील रमाकांत हणमंतराव कागणे याने भावा-भावातील संपतीच्या वाटणीच्या कारणावरून आत्महत्या केली आहे. मोठा भाऊ गोविंद व वहिनी अनुसया हे त्याच्या वाट्याला येणारी संपती वाटून देत नसल्याने रमाकांत कागणे याने आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. हिब्बट येथील शिवारात रमाकांत कागणेने गळफास घेण्यापूर्वी मोठा भाऊ गोविंद कागणे आणि वहिनी हे संपत्तीचा वाटा देत नसल्याचे म्हंटले आहे.
नांदेड, हिब्बट व देगलूरमध्ये संपत्ती असून मला संपत्तीतून बेदखल करत आहेत आणि मी मेल्यानंतर तो दारूच्या आहारी गेला होता, कर्जबाजारी झाला होता असे त्यांच्याकडून सांगितले जाईल असेही त्यांनी चित्रित केलेल्या आपल्या व्हिडिओमध्ये म्हंटले आहे.मात्र, “माझ्यावर झालेले कर्ज माझी पत्नी फेडेन कारण मला शेती आहे”. ‘मी आता तुम्हाला सोडून जात आहे, मला माफ करा’ असे शेवटचे बोलून त्याने गळफास लावून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच व सोशल मीडियावर रमाकांत कागणे यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला पाहून मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे व त्यांचे सहकारी यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी गळफास घेतलेला मृतदेह खाली उतरून पंचनामा केला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी सदरचा मृतदेह मुखेड येथील सरकारी रुग्णालयात दाखल केला.
या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक फड यांनी दिली.