श्री.संत सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित लिंबोटी येथील रक्तदान शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद

122
लोहा, नांदेड –

श्री.संत सेवालाल महाराज यांच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिभाऊ वाघमारे यांच्या पुढाकारातून लिंबोटी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदरील शिबिरात एकूण 55 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.

लोहा तालुक्यातील लिंबोटी येथे अभिभाऊ मित्रमंडळाच्या वतीने संत सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी लोहा न.प.चे नगरसेवक पंचशील कांबळे,वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष श्याम पाटील नळगे, लिंबोटीचे सरपंच गंगाधर राठोड, उपसरपंच कालिदास डोईफोडे, उमरगा (खो) ता. कंधारचे उपसरपंच सचिन बुकटे,आझाद ग्रुप महाराष्ट्र राज्याध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे, कपिलभाई मोरे, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष ‌सतिश आणेराव, धिरज हाके, अंकुश सोनवळे, प्रसाद पोले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आजघडीला प्रत्येकाने रक्तदान करून इतरांचे प्राण वाचविण्यासाठी पुढे येणे काळाची गरज निर्माण झाली असल्याचे नगरसेवक पंचशील कांबळे बोलताना म्हणाले.सदरील शिबिरात रक्तदात्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण ५५ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. गुरू गोविंदसिंग रक्तपेढी मार्फत रक्तसंकलन करण्यात आले. रक्त पेढीचे राहुल वाघमारे तसेच तंटामुक्ती अध्यक्ष माधव वाघमारे, सुरजकुमार वाघमारे, कोंडिबा बंडे, ॲड.दासरे, संतोष राठोड, अनिकेत लिंबोटीकर, धिरज शेळके, कल्याण आढाव, दीपक सापनर, बालाजी चव्हाण आदींनी शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. यावेळी अभिभाऊ वाघमारे यांनी उपस्थित मान्यवर व रक्तदात्यांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.