नांदेडमद्धे अवैधरित्या दारू विकणाऱ्या ढाब्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ढाबा मालकांसह ‘चपटी’ घेणाऱ्यांची उतरविली ‘झिंग’ ! 4 ढाबा मालकांसह 25 जणांना केली अटक

9,229

नांदेड |

शहरात जेवणाच्या ढाब्यांवर अवैधरित्या दारू विकणाऱ्या ढाबा मालकांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाने तिथे बसून दारू पिणाऱ्या 29 जणांना अटक करून त्यांची चांगलीच ‘झिंग’ उतरविली आहे. त्यांना न्यायालयाने एक लाख 87 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी नांदेड शहरातील नमस्कार चौक येथील चार ढाब्यावर कारवाई केली. या कारवाईदरम्यान त्यांनी 25 मद्यपींना अटक केली. या मद्यपींसह 4 ढाबा चालक, मालकांना न्यायालयाने एक लाख 87 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही कारवाई 25 सप्टेंबर रोजी करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडचे अधीक्षक अतुल कानडे यांनी जिल्ह्यातील विनापरवाना मद्यविक्री करणाऱ्या ढाब्यांवर कारवाई करण्याच्या सूचना आपल्या पथकाला दिल्या. त्यानुसार या पथकांनी नांदेड शहरातील नमस्कार चौक येथील हॉटेल शिवांश ढाबा, तुळजाई ढाबा, नमस्कार ढाबा, अंबाई ढाबा येथे छापा टाकत ही कारवाई केली. या ढाब्यावर ग्राहकांना शासनमान्य अनुज्ञप्ती मद्यसेवनास परवानगी नसताना मद्यपी बसून मद्यसेवन करताना आढळून आले. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संयुक्त मोहिम राबवून संबंधित ढाबे आणि हॉटेलवर दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून विनापरवाना मद्यसेवन करत बसलेले 25 ग्राहक व 4 ढाबा मालक व चालक असे एकूण 29 जणांना अटक करून 26 सप्टेंबर प्रथमवर्ग न्यायालय नांदेड येथे सर्वांना हजर केले असता एका ढाबा मालकास 70 हजार रुपये तर उर्वरित तीन ढाबा मालकांना प्रत्येकी 35 हजार रुपये व 25 मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी पाचशे रुपये असे एकूण एक लाख 87 हजार रुपये रकमेची दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.

यावेळी हॉटेल शिवांश ढाबाचे चालक मनोज देशमुख, रा.बारड ता.मुदखेड हल्ली मुक्काम नमस्कार चौक नांदेड, सुरेश लक्ष्मण सोनटक्के, रा.बारड, बाबुराव गंगाराम बडवे, रा.मगनपुरा नांदेड, अजय विनायक राठोड, रा.भावसार चौक, मंगेश नामदेवराव बागडे, नमस्कार चौक, तुळजाई ढाबाचे मालक बाळू देवराव शिंदे, रा.मेहबूबनगर नांदेड, संतोष विलास पाटील वसंत नगर, विलास नरहरी पावडे विजयनगर, सुरेश तुकाराम भोस ताजयनगर, शुभम दिगंबर पांडे जवाहरनगर तुप्पा, वैजनाथ माधव रोंधळे गोविंद नगर, रजनीश उत्तम खंदारे कर्मवीर नगर, सुरेश शिवाजी नागेश्वर विष्णुनगर, सुधीर दिगंबर भिसे विश्वकर्मा कॉलनी नांदेड, नमस्कार ढाबाचे चालक भुमन्ना नागोजीराव आक्केमवाड, रा.विष्णुनगर, आनंद नारायण तळणीकर रा.तळणी, सचिन सोपानराव पावडे पुयणी, नवनाथ बालाजी जाधव बाबानगर, रघुनाथ व्यंकटी पाटील, रातोळी ता.नायगाव, नरसिंह शहदत्त जंगीलवाड, जांमगाव ता.उमरी, पांडुरंग सुभाषराव राजेगोरे पासदगाव, गजानन शारंगधर उसळकर, रा.सातगाव जि.बुलढाणा, सचिन तुकाराम जाधव रा.पासदगाव तसेच अंबाई ढाबा चालक यशवंत मरीबा इंगोले, रा.पौर्णिमानगर, विलास नामदेव कऱ्हाळ, संजय पायनापल्ले, कैलास रामराव राजेगोरे शेलगाव, ता.अर्धापूर, गुरुप्रसादसिंह सरदारसिंह चौव्हाण, शक्तिनगर, अजयसिंह अवतारसिंह चौव्हाण महाराणा प्रताप चौक यांचा समावेश आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत निरीक्षक एम.ए.शेख, ए.एम.पठाण, एम.एम. बोदमवाड, बी.व्ही.हिप्परगेकर, ए.बी.चौधरी, दुय्यम निरीक्षक एच.एम.पाकलवाड, व्ही.व्ही.फुलारी, एस.व्ही. वाघमारे, ए.एन.पीकले, आर.डी.सोनवणे, एस.टी.कुबडे, जे.ए.गुट्टे, बी.बी.ईथ्थर व भरारी पथकाचे सहायक निरीक्षक, जवान बालाजी पवार, वाहन चालक यांचा समावेश होता.

Leave A Reply

Your email address will not be published.