लोहाच्या कारेगाव येथे एसटी बसवर दगडफेक ; दोघांवर गुन्हा दाखल

623

प्रदीप कांबळे,

लोहा, नांदेड –

लोहा शहरापासून पाच किमी अंतरावरील कारेगाव येथे नांदेड कडून येणाऱ्या एसटी बसवर दोघा मोटारसायकल वरील तरुणांनी दगडफेक करत गाडीचे जवळपास वीस हजाराचे नुकसान केल्याची तक्रार कंधार आगारातील एसटीचे चालक यांनी दिल्यावरून लोहा पोलिसात दोघा आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सद्यस्थितीत नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 चे रस्ता काम सुरू असून महामार्ग विभागाने रस्त्यावर सूचना फलक तसेच इतर माहिती फलक लावले नसल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दि. 14 रोजी सोमवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास नांदेड वरून लोह्याकडे येत असलेल्या बस क्र. एम एच 06 एस 8587 या परिवहन महामंडळाच्या बसमुळे नांदेडकडूनच लोह्याकडे येणाऱ्या मोटार सायकल क्र. एम एच 26 ए ए 8823 वरती धूळ उडल्याचा राग मनात धरून मोटारसायकल वरील दोघांनी कारेगाव नजिक येताच परिवहन महामंडळाची बस अडवून एसटीचे चालक यांच्याशी हुज्जत घालत आमच्या अंगावर तू धूळ का उडवलीस या कारणावरून दगडफेक करत चालकास थापड व बुक्यांनी मारहाण करत एसटीच्या काचा फोडल्या त्यात बसचे जवळपास वीस हजाराचे नुकसान झाल्याची तक्रार चालक श्रीराम हौसाजी कागणे यांनी लोहा पोलिसात दिल्यावरून आरोपी पृथ्वीराज राजुसिंग ठाकूर व बाळू चुडावकर यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा व इतर कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास हे पोउपनि मारोती सोनकांबळे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.