ऑटोरिक्षा चालकाची अशीही माणुसकी ! ऑटोत विसरलेली 40 हजार रुपये रोख व महत्वपूर्ण कागदपत्रे असलेली बॅग केली परत

2,915

नांदेड –

काल संध्याकाळी दि.26 मे रोजी गहाळ झालेली 40 हजार रुपये व महत्त्वाचे कागदपत्रे असलेली बॅग इतवारा पोलिसांनी अवघ्या अर्धा तासात शोधून बॅग मालकाला सुपूर्द केल्याने पोलीस व बॅग मालकाने ऑटो चालकाचा सन्मान केला आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, काल दि.26 मे रोजी संध्याकाळी मोहम्मद कलिमुद्दिन पिता मोहम्मद शमशुद्दीन हे पोलीस हेडकॉटर परिसरातून ऑटोमध्ये बसून किल्ला रोड येथे उतरले. प्रवास करताना त्यांच्यासोबत एक बॅग सुद्धा होती. त्यामद्धे 40 हजार रुपये रोख व काही महत्त्वाची कागदपत्रे होती. त्यांची बॅग सदर ऑटोमध्ये विसरून राहिली होती. बॅगमध्ये रोख रक्कम 40 हजार रुपये व सेवनिवृत्तीची सर्व कागदपत्र होते.

या प्रकरणी बॅग हरवल्या बाबतची तक्रार मोहम्मद कलीमद्दीन यांनी इतवारा पोलिस स्टेशन येथे नोंदवली. सदर तक्रारीवरून पोलीस अंमलदार शिवसांब मठपती यांच्याकडे तपास देण्यात आला.पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मठपती यांनी पुढील तपास सुरू केला. यावेळी मठपती यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज चेक करून सदर ऑटोचा क्रमांक MH-26, N1963 हस्तगत केला व सीटीबी इतवाराचे पोलीस कॉन्स्टेबल दांतापल्ले यांचे सहाय्य घेऊन त्यांच्या ई-चालन मशीन वरून मालकाचे नाव शोधले असता चालकाचे नाव सिताराम धोंडीबा जिंकवाड, रा. पांडुरंग नगर, नांदेड असे निष्पन्न झाले होते.

विशेष म्हणजे तपास चालू असताना त्यापूर्वीच सदर ऑटो चालकाने आपल्या इमानदारीचे दर्शन घडवत पोलीस स्टेशन इतवारा येथे स्वतः हजर झाले व सदरची बॅग पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी सदर बॅग पुर्णतः तपासून फिर्यादी यांना बोलावून सदर बॅग मिळाल्याची माहिती दिली. यावेळी फिर्यादी हे पोलीस स्टेशनला हजर झाल्याने त्यांना 40 हजार रुपये रोख रक्कम व कागदपत्र असलेली बॅग त्यांच्या ताब्यात देण्यात आली. यावेळी महिला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रुपाली कांबळे, पोलीस नाईक मठपती यांनी व बॅग मालकाने ऑटो चालकाचा सत्कार केला.

हरवलेली बॅग परत मिळवुन देण्यासाठी पोलिसांनी घेतलेले श्रम व ऑटो चालकाने स्वतःहून दाखवलेली इमानदारी व माणुसकी ही सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.