लोहा तालुक्यातील पेनुर येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेली सय्यदबाबा ऊर्स (यात्रा) 12 जानेवारी पासून प्रारंभ

397

लोहा, नांदेड –

तालुक्यातील पेनूर येथे हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेला सय्यद बाबा दर्गा असून प्रतिवर्ष येथे भव्य यात्रा भरते. सदरील ऊर्सनिमित्त पेनुर येथे दि.12 व 13 जानेवारी रोजी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात्रा महोत्सवात यात्रा कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील यात्रेत पंचक्रोशीतील हिंदू मुस्लिम बांधव बहुसंख्येने सहभागी होतात.

मागील अनेक वर्षापासून अखंडितपणे हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या भक्तीभावाने प्रत्येक गुरुवारी दर्ग्यामध्ये दर्शनासाठी हजेरी लावतात. दर्शनासाठी आलेले भाविक मोठ्या भक्तीभावाने दर्ग्यामध्ये बेल, फुल, अगरबत्ती, उद, साखर घेऊन दर्ग्यामध्ये दर्शनासाठी येत असतात. ही परंपरा मागील अनेक वर्षापासून अखंडितपणे सुरु आहे. दर्ग्याच्या परिसरामध्ये मोठे महात्म्य असून या दर्ग्याची सर्वदूर मोठी ख्याती आहे. विशेष म्हणजे दर्ग्यामध्ये दररोज हिंदू आणि मुस्लिम धर्मीय बांधवांच्या वतीने तेलाचा दिवा लावला जातो. या ठिकाणी आलेल्या भाविक भक्तांच्या सर्व इच्छा आकांशा दर्ग्यात पूर्ण होतात अशी आख्यायिका असल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होतात.

Leave A Reply

Your email address will not be published.