नांदेड येथील वैद्यकीय अध्यापकांचा सरकारला जागे करण्यासाठी थाळीनाद व घंटानाद आंदोलन

483

नांदेड –

नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक मागील काही दिवसापासून त्यांच्या प्रलंबित मागण्याकरिता आंदोलन करीत असून दि. 3 मार्च रोजी त्यांनी काळी फिती लावून काम केले व दि 4 मार्च  रोजी महाविद्यालयाच्या परिसरात कॅन्डल मार्च केला.

आज वैद्यकीय अध्यापकांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर घंटानाद व थाळीनाद करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. हे आंदोलन महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होत असून आज सकाळी लातूर, अंबेजोगाई, अकोला, चंद्रपूर इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज, नागपूर, औरंगाबाद, जळगाव, पुणे, बारामती, मुंबईतील जे.जे.हॉस्पिटल या सर्व ठिकाणी घंटानाद आंदोलन करून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.या आंदोलनामध्ये वैद्यकीय अध्यापकांच्या प्रमुख मागण्या पैकी सातव्या वेतन आयोगाची थकीत भत्ते, आश्वासित प्रगती योजना, आस्थाई सहाय्यक प्राध्यापकांचे समावेशन या व इतर मागण्या करिता हे आंदोलन चालू असून महाराष्ट्रभर हे आंदोलन पसरले आहे. दिनांक 14 मार्च रोजी रुग्णसेवेवर बहिष्कार घालून हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय मोरे यांनी दिला.

आजच्या  नांदेड येथील आंदोलनाचे नेतृत्व डॉ.जे.बी देशमुख, डॉ.किशोर राठोड ,डॉ.राहुल परसोडे, डॉ. विशाल टेकाळे, डॉ.विजय कापसे, डॉ.निशिकांत गडपायले यांनी केले असून आजच्या आंदोलनामध्ये डॉ.वैशाली इनामदार, डॉ.सुधा करडखेडकर, डॉ. इशरत, डॉ.हुमेरा, डॉ.मुळे, डॉ.सुपर्णा, डॉ.अनुजा देशमुख मॅडम, डॉ.हेमंत गोडबोले, डॉ.मनूरकर, डॉ.गट्टणी, अनिस सर सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.